AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरड्या त्वचेने हैराण? तर वापरा घरगुती ‘स्क्रब’!

लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

कोरड्या त्वचेने हैराण? तर वापरा घरगुती ‘स्क्रब’!
| Updated on: Mar 29, 2021 | 9:37 AM
Share

मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Try a homemade scrub to get rid of dry skin)

महागड्या उत्पादनांऐवजी आपण घरगुती उपाय केले तरी आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसू शकते. आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होईल. त्वचेतील मृत पेशी आणि त्वचेचा वरचा थर स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरुन नवीन त्वचा तयार होऊ शकेल. त्यासाठी हे घरगुती स्क्रब उपयुक्त ठरू शकते.

साहित्य

-एक चमचे बेसन पीठ

-एक चिमूटभर हळद

-थंड दूध किंवा दही

-पेस्ट तयार करण्यासाठी हे सर्व मिश्रण एका भांड्यात घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा दहा मिनिटे तसेच राहूद्या. हे सुकल्यानंतर ओलसर हाताने स्वच्छ करा हे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि नंतर तो मॉइश्चराइझ करा. हे स्क्रब साधारण आठवड्यातून दोन वेळा लावा.

-जर कुणाच्या चेहऱ्याची त्वचा कोरडी असल्यास त्यांनी ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी मालिश करावी. हा उपाय दररोज केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.

-बेसन पीठ, चंदन आणि पीठ एकत्रीत करुन त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल.

-मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Try a homemade scrub to get rid of dry skin)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.