केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा, वाचा !

केसगळती, शुष्क केस, कोंडा अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहेत.

केस गळती रोखण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करून पाहा, वाचा !
केस गळती
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 4:27 PM

मुंबई : केसगळती, शुष्क केस, कोंडा अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहेत. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी (Hair Care) घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. (Try home remedies to prevent hair loss)

जास्वंद व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. यात केसांच्या मुळांना बळकट करण्याची क्षमता असते. जर आपण या जास्वंदाच्या तेलाने आपल्या केसांची नियमितपणे मालिश केली, तर केस गळण्याची समस्या नाहीशी होते आणि केस अधिक मजबूत होतात. तसेच नवीन केसही वाढतात. जर आपण दररोज हे करू शकत नसाल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस, या तेलाने नक्कीच मालिश करा.केसांची लांबी वाढविण्यासाठी आपण रात्री नारळ तेलाने मेथी दाणे शिजवू ठेवा.

त्यानंतर सकाळी उठून मेथी दाणे आणि तेल वेगळे करा आणि त्या तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल लावावे. एका महिन्यात तुम्हाला फरक दिसेल. सकाळी त्याची पेस्ट बनवताना त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे केसांमध्ये लावा आणि नंतर केस धुवा. आपण ही पेस्ट आठवड्यातून दोनदा केसांना लावू शकता. दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा.

पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची तुमची दूर होईल. आठवड्यातून किमान दोनवेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत. केसगळती व केस कमकुवत होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोंडा.

टाळूच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा न झाल्यास कोंड्यासह अन्य समस्या उद्भवतात. केसांचे नुकसान टाळण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये कांद्याच्या रसाचा समावेश करून पाहावा. आपल्या केसांच्या लांबीनुसार कांद्याचा रस घ्यावा. यामध्ये एक ते दोन चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळूसह संपूर्ण केसांवर लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत मिळेल आणि केसांची वाढ देखील चांगली होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Treatment | केस सरळ करण्याचा विचार करताय? जाणून घ्या वेगवेगळ्या ‘हेअर ट्रीटमेंट’मधले फरक…

(Try home remedies to prevent hair loss)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.