लांब, घनदाट आणि सुंदर केसांसाठी बेस्ट उपाय… घरच्या घरी बनवा 3 शॅम्पू…

महिलांचा घरगुती उपायांकडे जास्त पसंती दिसून येत आहे. बाजारात केसांचं सौदर्य वाढविण्यासाठी विविध शॅम्पू उपलब्ध आहेत. मात्र या कॅमिकेलयुक्त शॅम्पूमुळे काही वेळेसाठी केस चांगले दिसतात. मात्र दीर्घकाळापर्यंत ते सौदर्य टिकून राहत नाही. आणि केसांचं हळूहळू नुकसान होतं.

लांब, घनदाट आणि सुंदर केसांसाठी बेस्ट उपाय... घरच्या घरी बनवा 3 शॅम्पू...
Hair-care
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 2:21 PM

लांब, घनदाट आणि सुंदर केस (hair) असावे हे प्रत्येक महिलेला वाटतं असतं. आज काल नॅचरल गोष्टींकडे लोकांचा कल वाढला आहे. मार्केटमध्ये नॅचरल गोष्टींपासून बनवलेले सौंदर्य प्रसाधने मिळतात. मात्र तरी महिलांचा घरगुती उपायांकडे जास्त पसंती दिसून येत आहे. बाजारात केसांचं सौदर्य वाढविण्यासाठी विविध शॅम्पू उपलब्ध आहेत. मात्र या कॅमिकेलयुक्त शॅम्पूमुळे काही वेळेसाठी केस चांगले दिसतात. मात्र दीर्घकाळापर्यंत ते सौदर्य टिकून राहत नाही. आणि केसांचं हळूहळू नुकसान होतं. केसांच्या आरोग्यासाठी आपण घरी हेअर मास्क बनवू शकतो. तसंच घरगुती शॅम्पू (homemade shampoo) पण आपण तयार करु शकतो. आज आम्ही तुम्हाला लांब केसांसाठी (hair growth)शॅम्पूचे प्रकार सांगणार आहेत. चला तर कसं तयार करायचे हे शॅम्पू ते जाणून घेऊयात.

आवळा आणि शिककाई शॅम्पू –

साहित्य 1. रीठा पावडर – 1 वाटी 2. आवळा पावडर – अर्धा वाटी 3. शिककाई – अर्धा वाटी 4. फ्लेक्स बिया – अर्धा वाटी

कसा तयार करणार शॅम्पू – एका कढईत 3 ते 4 ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. पाण्या चांगली उकळी आल्यावर वरील सगळे साहित्य एक एक करुन टाका. या मिश्रणाला कमी फ्लेमवर जवळपास 20 मिनिटं उकळा. हे मिश्रण थंड झाल्यावर एका काचेच्या बॉटल किंवा भरणीत गाळून ठेवा, हा शॅम्पू वापरण्यासाठी तयार.

कडुलिंबाच्या पानाचा शॅम्पू

साहित्य 1. कडुलिंबाची पानं 2. बेबी शॅम्पू 3. एसेंशियल ऑयल

शॅम्पूची विधी – कडुलिंब पानांची मिक्सरमधून पेस्ट तयार करुन घ्या. आता ही पेस्ट चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. आता या कडुलिंबाच्या रसात बेबी शॅप्मू, 2 ते 3 थेंब एसेंशियल ऑयल मिक्स करा. या शॅम्पूने आठवड्यातून तीन वेळा केस धुवा.

रीठा शॅम्पू

रीठा हे आयुर्वैदिक औषधं आहे. रीठा आरोग्यासोबत केसांसाठीही गुणकारी आहे. निर्जीव केसांसाठी रीठा हा रामबाण उपाय आहे.

कसा तयार करणार शॅम्पू – एका बाऊलमध्ये 5 ते 8 रीठा पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी रीठामधून बी बाहेर काढा. आणि आता रीठात अजून पाणी घालून गॅसवर चांगलं उकळा. आता चाळणीतून हे गाळून घ्या. आणि या पाण्याने केस धुवा. घरगुती उपाय करताना धैर्य ठेवण्याची गरज असते. आपण पूर्वी केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर केला असतो. यात आपल्या केसांचं खूप नुकसान झालं आहे. घरगुती उपाय करताना केसांचा स्तर परत चांगल्या होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून तुम्ही कंटाळून हे उपाय करणं सोडू नका.

टीप : या बातमीतील सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे. या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

मूड खराब असेल तर ‘हे’ करू नका… अन्यथा तुटू शकतं तुमचं नातं..!

मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय

वारंवार पेनकिलर घेताय? वेळीच सावध व्हा… शरीरावर होतात गंभीर परिणाम

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.