‘वर्क फ्रॉम होम’मुळे तरुणांमध्ये मृत्यूचा वाढता धोका, संशोधनाचा धक्कादायक अहवाल

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनशैलीत मोठा बदल देखील झाला आहे.

'वर्क फ्रॉम होम'मुळे तरुणांमध्ये मृत्यूचा वाढता धोका, संशोधनाचा धक्कादायक अहवाल
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 11:56 AM

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनशैलीत मोठा बदल देखील झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून बहुतेक शासकिय, नियमशासकीय कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनच्या काळात तर मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी व्रर्क फ्रॅाम होमच केले. आता हळूहळू कार्यालये सुरू होत आहेत. मात्र, याचदरम्यान एका संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Work from home increases the risk of death in young people research shows)

गेल्या दहा महिन्यांपासून देशात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे लोक बर्‍याच दिवसांपासून घरात बसून कार्यालयीन कामे करत आहेत. यामुळे लोकांना एकाच जागी बसण्याची सवय झाली आहे. अलीकडेच ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने या संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.

या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. यात जे लोक कार्यालयीन कामे घरून करतात. अशा हजारो लोकांचा अभ्यास केला गेला. यामध्ये संशोधकांना असे आढळले आहे की, जे लोक दिवसभर एकाच जागी बसून राहतात बिलकुल हालचाली करत नाही. त्यांना तरुण वयात मृत्यूची जोखीम वाढवते, परंतु जर त्यांनी थोड्या हालचाली केल्या तर शक्यता कमी आहे.

50 हजार लोकांवर संशोधन केले

युरोप आणि अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे 50,000 लोकांवर संशोधकांनी संशोधन केले आणि हे परिणाम दिसून आले. संशोधकांना असे आढळले आहे की, जर लोक अगदी साधा व्यायाम करत असतील किंवा दहा मिनिटे वेगवान चालत असतील तर, दुष्परिणाम बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. त्याच वेळी, जे लोक 35 मिनिटांपेक्षाही जास्त व्यायाम करत असतील तर अशा प्रकारच्या दुष्परिणामांपासून दुर राहतात. म्हणूनच, जर आपण देखील घरून काम करत असाल तर जास्त वेळ एकाच जागी बसण्यापेक्षा हालचाली आणि नियमित व्यायाम करा, जेणेकरून असे दुष्परिणाम होणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

Gold Rate : सोनं वाढलं की दरात झाली घसरण? पाहा आठवड्याभराचे भाव

खातेदारांचं टेन्शन वाढणार! RBI ने ‘या’ बँकेवरचे निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले

(Work from home increases the risk of death in young people research shows)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.