VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता (23 corona positive patients funeral in Osmanabad at one time).

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:19 PM

उस्मानाबाद : राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रात तर फार भीषण परिस्थिती आहे. कोरोनामुळे राज्यातील मृत्यू दरातही प्रचंड वाढ झालीय. उस्मानाबादेत तर आज (16 एप्रिल) दिवसभरात तब्बल 23 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीत मृतक रुग्णांच्या नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा होता (23 corona positive patients funeral in Osmanabad at one time).

अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुरी

एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार करण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरी वेळ आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडत आहे. यापूर्वी 14 एप्रिलला 17 कोरोनाबाधित मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाने 667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सरण रचण्यासाठी लाकडं कमी

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. स्मशानभूमीत आज जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकंच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत (23 corona positive patients funeral in Osmanabad at one time).

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 764 नवे रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 764 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद तालुक्यात 451, तुळजापूर 72, उमरगा 57, लोहारा 17, कळंब 59, वाशी 36, भूम 40 आणि परंडा येथीस 32 रुग्णांची समावेश आहे. कोरोनाबाधितांचे हे नवे आकडे धडकी भरवणारे आहेत. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गेल्या महिन्याभरातील आकडेवारी

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्याभरातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर मार्च महिन्यापासून सुरु झालेली ही आकडेवारी वाढत राहिली. 24 मार्चला ही आकडेवारी 176 वर होती. मात्र, आज ही आकडेवारी थेट 764 वर पोहोचली आहे.

24 मार्च – 176 25 मार्च – 174 26 मार्च – 155 27 मार्च – 224 28 मार्च – 184 29 मार्च – 239 30 मार्च – 242 31 मार्च – 253 01 एप्रिल – 283 02 एप्रिल – 292 03 एप्रिल – 343 04 एप्रिल – 252 05 एप्रिल – 423 06 एप्रिल – 415 07 एप्रिल – 468 08 एप्रिल – 489 09 एप्रिल – 564 10 एप्रिल – 558 11 एप्रिल – 573 12 एप्रिल – 680 13 एप्रिल – 590 14 एप्रिल – 613 15 एप्रिल – 764

संबंधित बातमी : उस्मानाबादेत स्मशानभूमीही गहिवरली! एकावेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, 8 मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.