नाशिक जिल्ह्यात 464 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एका रुग्णाचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात सध्या 464 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात एका रुग्णाचा काल मृत्यू झाल्याचे समजते.
नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 464 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात एका रुग्णाचा काल मृत्यू झाल्याचे समजते. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सिन्नर तालुक्यात 98 आहेत. त्यापाठोपाठ निफाडमध्ये 90 रुग्ण आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 182 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 723 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
असे आहेत रुग्ण
उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 51, बागलाण 13, चांदवड 12, देवळा 06, दिंडोरी 16, इगतपुरी 03, कळवण 01, मालेगाव 01, निफाड 90, सिन्नर 98, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 02, येवला 17 अशा एकूण 311 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 133, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 05 तर जिल्ह्याबाहेरील 15 रुग्ण असून, असे एकूण 464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 369 रुग्ण आढळून आले आहेत.
काल आढळून आलेले बाधित
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 02, बागलाण 01, निफाड 09, सिन्नर 12, येवला 01 असे एकूण 25 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.12 टक्के, नाशिक शहरात 98.22 टक्के, मालेगावमध्ये 97.14 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये कोरोनाने 4 हजार 230 मृत्यू झाले आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 09, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 723 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
संख्या वाढल्यास निर्बंध
कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज एक बैठक घेतली. त्यात म्हणाले की, साऊथ आफ्रिकेत स्पर्धा जिंकून आलेल्या स्पर्धकांच्या टेस्ट निगेटीव्ह आहेत. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करतो आहोत. जे लोक स्वागत समारंभात उपस्थित होते, त्यांनी टेस्ट करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सीएम साहेबांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉनचे 32 म्यूटन्ट आहेत. लगेच निर्बंध घातले जाणार नाहीत. मात्र, काळजी घेणे महत्वाचे आहे. संख्या वाढल्यास निर्बंध लादावे लागतील. आता मात्र पहिल्या लाटेसारखे सेन्सेटीव्ह व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्याः
साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर