व्हिडिओ व्हायरल, महानगरपालिकेला आली जाग, गाढवांविरोधात कारवाई, पाहा Video

Sangali News | सांगली शहरात गाढवामुळे झालेल्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मनपाच्या विरोधात कॉमेंट सुरु झाल्या. त्यानंतर महानगरपालिकेने भटक्या गाढवांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. व्हिडिओमधील थरार पहिल्यानंतर नऊ गाढवांना पकडण्यात आले आहे.

व्हिडिओ व्हायरल, महानगरपालिकेला आली जाग, गाढवांविरोधात कारवाई, पाहा Video
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 11:46 AM

शंकर देवकुळे, सांगली, दि. 11 जानेवारी 2024 | सांगली शहरातच नव्हे तर परिसरात सध्या गाढवांच्या विषयाची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे सांगली मनपाचे प्रशासन जागे झाले आहे. महानगरपालिकेने गाढवांविरोधात कारवाई सुरु केली आहे. गाढवामुळे झालेल्या अपघाताचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओनंतर महानगरपालिकेने भटक्या गाढवांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. नेटकऱ्यांनी सांगली महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर मनपा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे पकडण्यात आली.

नेटकऱ्यांची नाराजी अन् कारवाई

सांगली शहरातील प्रमुख मार्ग, अंतर्गत रस्त्यांवर भटक्या जनावरांची संख्या मोठी आहे. या जनावरांमुळे राजरोस अपघात होत असतात मात्र, यांचा बंदोबस्त केला जात नाही. सांगली शहर आणि परिसरात अनेक रस्त्यावर मोकाट गाढव फिरत असतात. मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असते. मात्र, अपघात झाल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या विरोधात कॉमेंट सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली.

हे सुद्धा वाचा

विशेष मोहीम केली सुरु

सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त होऊ लागली. त्यानंतर मनपाने विशेष मोहीम राबवून नऊ गाढवे पकडली. मात्र, एका दिवसासाठी ही मोहीम राबवून चलणार नाही. मनपाने सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. कारण सांगली महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरे फिरत असतात. त्यात शहरातील गावभाग परिसरात तर मोकाट गाढवांची संख्या मोठी आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर कारवाई झाली नव्हती.

काय आहे व्हिडिओत

एका मोकाट गाढवामुळे अपघात झाल्याचा हा व्हिडिओ आहे. रस्त्यावरुन जाणारा मोटारसायकलस्वार अचानक आलेल्या गाढवामुळे गाडीवरुन पडल्याचे दिसत आहे. पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हरीपुर रोडवर हा अपघात झाला आहे. या अपघातात तरुण जखमी झाला. मात्र, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होताच महापालिका प्रशासनाला जाग आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.