लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांवर अखेर सलमाननं मौन सोडलं; पहिल्यांदाच बोलला, पाहा व्हिडीओ
बिग बॉसचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये सलमान खानने पहिल्यांदाच बिश्नोई गँगकडून आपल्या धमक्यांवर आपलं मौन सोडलं आहे.
अभिनेता सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉसचा सीजन 18 सुरू झाला आहे. मात्र जसा हा शो सुरू झाला तशा सलमान खानच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे निकटवर्तीय होते.या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्विकारली आहे.या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे.याचदरम्यान सलमानला देखील धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमकीनंतर देखील सलमाननं बिग बॉसचं चित्रिकरण सुरूच ठेवलं आहे.
बिग बॉसच्या विकेंडचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान शिल्पा शिरोडकरची समजूत घालताना दिसत आहे. असं म्हटलं आहे की या व्हिडीओच्या माध्यमातून सलमान खान याने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळत असलेल्या धमक्यांवर आपलं मौन तोडलं आहे.या व्हिडीओच्या प्रोमोमध्ये सलमान खाननं म्हटलं आहे की, मला आज या शोला यायंचं नव्हतं मात्र काम करावं लागतं त्यामुळे यावं लागलं.
काय आहे हा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये सलमान खान शिल्पा शिरोडकरला म्हटला की आय हेट टीयर्स शिल्पा, जेव्हा तुझी मुलगी जेवणावर राग काढत होती तेव्हा तू तीला काय सांगत होतीस. यावर बोलताना शिल्पाने म्हटलं की जेवणावर राग नाही तर अॅटिट्यूडवर राग आहे.तेव्हा सलमान तिला म्हणाला की मग त्या अॅटिट्यूडवर राग काढ. फिलिग्ससोबत तुमचं कोणतही नातं या घरात नसलं पाहिजे.
View this post on Instagram
सलमानने मौन तोडलं
शिल्पाची समजून काढताना सलमानने म्हटलं की, जशी की माझी फिलिंग आहे, मला इथे यायचच नव्हतं, पण काम आहे. एखाद्या मानसाला जे करावं लागतं ते करावंच लागतं. सलमान खानच्या या वक्तव्यावरून आता त्याचे फॅन असा अंदाज लावत आहेत की ही प्रतिक्रिया त्याने त्याच्या आयुष्यात सुरू असलेल्या घटनांवर दिली आहे.