Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?

Gunratna Sadavarte: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासंची पोलीस कोठडी दिली आहे. त्यानंतर सदावर्ते यांचे वकील अ‍ॅड. महेश वासवानी यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही सदावर्तेंना कोठडी देण्यास विरोध केला होता.

Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?
सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 6:39 PM

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासंची पोलीस कोठडी (police custody)  दिली आहे. त्यानंतर सदावर्ते यांचे वकील अ‍ॅड. महेश वासवानी (mahesh vaswani) यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही सदावर्तेंना कोठडी देण्यास विरोध केला होता. सदावर्ते यांच्याकडून कोणतीही रिकव्हरी करायची नाही. तसेच ते पळूनही जाणार नाही. त्यांचं घर मुंबईत आहे. ते साक्षीदारांवरही दबाव आणणार नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देऊ नये असं आम्ही कोर्टाला सांगितलं. मात्र, एफआयआरमध्ये षडयंत्राची कलम टाकण्यात आल्याने ते तपासण्यासाठी सदावर्तेंना पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती वासवानी यांनी दिली. तसेच यात काही निष्पन्न झालं तर एसटी कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कोठडी दिली जाणार असल्याचं कोर्टाने म्हटल्याचं वासवानी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, किल्ला कोर्टाने आज सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाने कोठडी सुनावल्यानंतर महेश वासवानी यांनी मीडियाशी संवाद साधला. सदावर्तेंप्रकरणावर अडीच तीन तास सुनावणी झाली. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी सदावर्ते हे न्यायाधीस मृदुला भाटकर यांच्या कोर्टात युक्तिवाद करत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांचा कोणताच रोल नाही. आम्ही सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध करतो. त्याला प्रोत्साहन देत नाही, असं आम्ही कोर्टाला सांगितलं, अशी माहिती वासवानी यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले दिले

सदावर्तेंना अटक केल्यानंतर त्यांना कोठडी देण्याची गरज नाही. त्यांच्याकडून काही रिकव्हरी करायची नाही. ते कोर्ट सोडून पळून जाणार नाही, त्यांचं घर फिक्स आहे. कोणत्याही साक्षीदारावर ते दबाव आणणार नाहीत. पोलिसांनीही या गोष्टी म्हटल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बेल द्यावी, अशी कोर्टाला विनंती केली. तसेच यावेळी कोर्टाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखलेही दिले, असं त्यांनी सांगितलं. पण षडयंत्राचं कलम लावल्यामुळे कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी दिली. तसेच इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी दिली. षडयंत्रं प्रकरणी काही माहिती मिळाली तर या आरोपींना पुन्हा कोठडी दिली जाईल, असं महेश वासवानी यांनी सांगितलं.

सदावर्तेंना खोटं फ्रेम केलं

सदावर्ते यांची हिस्ट्रीही आम्ही कोर्टाला सांगितली. सदावर्ते यांनी आरक्षणाविरोधात आवाज उठवला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात यश आलं होतं. त्यांची पत्नी धुरंदर वकील आहे. त्यांनी लोकहितासाठी केस लढवल्या. गृहमंत्र्यांविरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्यांना टार्गेट केलं असावं असं त्यांना वाटतं. काही राजकारण्याविरोधात सदावर्ते यांनी 600 कोटीच्या घोटाळ्याची तक्रार केली होती. 15 मार्च 2022 ला ही तक्रार केली होती. त्यामुळे केस नोंदवण्यात येऊ नये म्हणून त्यांना खोटं फ्रेम केलं आहे, असं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

Gunratna Sadavarte: दिलासा नाही! गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पवारांच्या घरासमोरील आंदोलन भोवलं

Gunratna Sadavarte : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या, त्या बाहेर काढल्या, त्याचाच वचपा सरकारने काढला, जयश्री पाटलांचा पवारांवर थेट आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.