राणेंचा बीपी वाढला, डॉक्टर म्हणतात, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून रक्तदाब वाढला आहे. तसेच ते डायबिटीजचे पेशंट असल्यामुळे त्यांचे रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.

राणेंचा बीपी वाढला, डॉक्टर म्हणतात, हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं
narayan rane and doctor
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 4:34 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अटकेनंतर आता राणे यांच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून रक्तदाब वाढला आहे. तसेच ते डायबिटीजचे पेशंट असल्यामुळे त्यांचे रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांना पुढील ट्रिटमेंट द्यावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. (after controversial statement on Uddhav Thackeray Narayan Rane facing high blood pressure problem needs Hospitalization said doctor)

डॉक्टर काय म्हणाले ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवून राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथून अटक केली. मात्र, या अटकेनंतर राणे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. ते 69 वर्षांचे आहेत. त्याविषयीची माहिती राणे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. “सॅच्युरेशन नॉरमल आहे मात्र बीपी वाढलेला आहे. वय पाहता बीपी वाढला आहे. ते डायबिटीजचे पेशंट आहेत. ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल,” असं डॉक्टरांनी सांगितलं.

नारायण राणेंच्या अटकेची प्रक्रिया कशी झाली?

नारायण राणे यांच्यावर रत्नागिरीत कारवाई होईल, रत्नागिरी पोलीस हे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करतील आणि प्रकरण नाशिक पोलिसांकडे वर्ग करुन नाशिक पोलीस त्यांना कोर्टात हजर करतील, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती. त्याप्रमाणे बंद दरवाजाआड पोलिसांनी नारायण राणेंना त्यांच्यावर लावलेल्या कलमांची आणि गुन्ह्याच्या स्वरुपाची माहिती देण्यात आली. वैद्यकीय तपासणी केली असता नारायण राणेंचे ब्लड प्रेशर आणि शुगर वाढल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. त्यानंतर जवळपास तासाभराच्या ताणाताणीनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली.

इतर बातम्या :

Narayan Rane arrests Live : राणेंना जेवणाच्या ताटावरुन उठवलं, त्यांच्या जीवाला धोका : प्रसाद लाड

Narayan Rane Arrests : नारायण राणे यांना अखेर अटक, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर रत्नागिरीत कारवाई

नारायण राणेंना संगमेश्वरमध्ये अटक; अटकेचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर!

(after controversial statement on uddhav thackeray narayan rane facing high blood pressure problem needs Hospitalization said doctor)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.