Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 जणांचे निलंबन, दोघांच्या सेवा समाप्त

Ahmednagar Hospital Fire | अहमनदनगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणात टीका झाल्यानंतर आता राज्य सरकारने मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकाऱ्यांसह एका स्टाफ नर्सचे निलंबन तर दोन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आलीय.

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 जणांचे निलंबन, दोघांच्या सेवा समाप्त
अहमदगरमध्ये शासकीय रुग्णालयाला आग, 11 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 7:49 PM

अहमदनगर : अहमनदनगर जिल्हा रुग्णालयात आग प्रकरणात टीका झाल्यानंतर आता राज्य सरकारने मोठी कारवाई केलीय. या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकाऱ्यांसह एका स्टाफ नर्सचे निलंबन तर दोन कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आलीय. यामध्ये स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिलीय.

ठाकरे सरकारवर राज्यभरातून टीका, आता निलंबनाची कारवाई 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात 7 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या भीषण आगीत एकून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांची प्रकृती खालावली होती. या दुर्घटनेत अकरा जणांनी प्राण गमावल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. राज्य सरकारला लक्ष्य केले जाऊ लागले. पतंप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाहा यांनादेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं होतं. मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यामुळे ठाकरे सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ पाच लाखांची मदत जाहीर केली होती. तसेच दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वसन देण्यात आले होते. त्यानंतर आता रुग्णालयातील चार अधिकारी तसेच दोन कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई ?

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित 2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित 3. डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित 4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित 5. आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त 6. चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त

(ahmednagar hospital fire case government suspended four officials taking action against total six employee information given by rajesh tope)

इतर बातम्या :

आता मी ढवळाढवळ करू का?, उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा

VIDEO | अँटेलियाची सुरक्षा वाढवली, टॅक्सीवाल्याला लोकेशन विचारणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु

पालखी मार्गाच्या कार्यात महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.