पारनेरमध्ये नगरसेवकाची दादागिरी, ट्रस्टीला बेदम मारहाण, नेमकं प्रकरण काय?

राज्यात अनेक ठिकाणी मारहाण, महिलांवरील अत्याचार आणि हत्येच्या घटना समोर येत आहेत. आतादेखील पारनेरमधून मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पारनेरमध्ये एका नगरसेवकाने ट्रस्टीला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

पारनेरमध्ये नगरसेवकाची दादागिरी, ट्रस्टीला बेदम मारहाण, नेमकं प्रकरण काय?
पारनेरमध्ये नगरसेवकाची दादागिरी, ट्रस्टीला बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 6:39 PM

अहिल्यानगरच्या पारनेर येथे नगरसेवकाने गणपती देवस्थान ट्रस्टच्या जमिनीच्या वादातून ट्रस्टीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीचे सदस्य सुनील चौधरी यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात युवराज पठारे, नामदेव पठारे, यशवंत पठारे, कुंडलिक पठारे आणि इतर सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुपा रोडवरील गणपती देवस्थानच्या जागेवर पठारे कुटुंबियांनी केलेले अतिक्रमण काढावे म्हणून 2018 मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारनेर नगरपंचायतीकडे अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये नोटीस पाठवल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतच्यावतीने अतिक्रमण धारकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

याचाच पाठपुरावा करण्यासाठी देवस्थानचे सदस्य सुनील चौधरी हे नगरपंचायतमध्ये गेले असता तिथे येत नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी चौधरी यांना उचलून नेले आणि घरी जाऊन बांबूने आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने पारनेर तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

बीडनंतर धाराशिव आणि उरणमध्ये सरपंचांवर हल्ला

बीडच्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना बीड पाठोपाठ धाराशिव आणि उरणमध्येदेखील सरपंचावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला. जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्या फोर व्हिलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारुळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जाताना ही हल्ल्याची घटना घडली. गुंडांनी गाडीच्या काचा दगडाने फोडून, गाडीवर पेट्रोल आणि अंडी टाकून हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचासह एक जण जखमी आहे. पवनचक्कीच्या वादातुन हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. तर पनवेलच्या उरण येथील गावातही सरपंचावर हल्ल्याची घटना घडली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.