AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

winter session : सुशांतसिंह प्रकरणाचं काय झालं पाहिलं ना’, परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याच्या मागणीवर अजितदादांचं उत्तर

परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला सीबीआय कशाला हवी? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी केली काय झालं? पाहिले ना...अशी खोचक प्रतिक्रिया उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

winter session : सुशांतसिंह प्रकरणाचं काय झालं पाहिलं ना', परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याच्या मागणीवर अजितदादांचं उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 7:35 PM
Share

मुंबई : उद्यापासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसू लागले आहेत, कारण अधिवेशनाच्या आधी चहापानाला सर्वपक्षीय सदस्य उपस्थिती लावत असतात, मात्र भाजपने या चहापानावर बहिष्कार टाकल्याचे पहायला मिळाले, त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भाजपला चिमटे काढले, तसेच टीईटी परीक्षा घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे द्या म्हणणाऱ्या भाजपलाही अजित पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिले आहे.

सुशांतसिंह प्रकरणाचं काय झालं? पाहिलं ना…

परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार करत आहेत. त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीला सीबीआय कशाला हवी? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी केली काय झालं? पाहिले ना…अशी खोचक प्रतिक्रिया उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिले आहे. तसेच राज्याची पोलीस यंत्रणा योग्य तपास करत आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

दोषींवर कठोर कारवाई होणार

सीबीआय चौकशी करते, राज्याच्या पोलीस खात्याकडून माहिती घेऊनच करते, त्यामुळे राज्य सरकारची पोलीस यंत्रणा त्याच्या तपासाला सक्षम आहे. पोलिसांनी यात आतापर्यंत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, यात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. यात यांच्या नेमणुका कधी झाल्या हेही तपासण्यात येईल असेही अजित पवार म्हणाले आहेत. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर त्यात भ्रष्टाचार झाला आहे की नाही? हे पाहून भरती आणि नियुक्तींबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आरक्षण आणि इतर प्रश्नांबरोबरच परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीचा मुद्दाही अधिवेशानात तापणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

संसदेच्या नियमावलीची पुस्तिका भिरकावली, टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

Mobile Theft | चोरीचा मामला, सासूसुनेचा गेम फसला! कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक

Pune crime |’हफ्ता दे’  म्हणत दुकानदाराला मारहाण करणाऱ्या गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.