Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

वीजबिल वसुलीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, असं उत्तर त्यांनी दिलं (Ajit Pawar on Excess Electricity bill),

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 7:30 PM

अहमदनगर : वीजबिल वसुलीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. ते आज श्रींगोदा येथे आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना वीजबिल वसुलीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज पंपासाठी सवलत सरकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं (Ajit Pawar on Excess Electricity bill).

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरता सवलत दिली आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो. तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता माफ केले आहेत”, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंधा येथे पत्रकारांसोबत बोलताना केलं (Ajit Pawar on Excess Electricity bill).

राजू शेट्टींचा सरकारला इशारा

दरम्यान, वीजबिल सक्त वसुल करण्याच्या धोरणावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. “लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याऐवजी जर सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हाला सुद्धा दोन हात करण्याशिवाय पर्याय नाही. वीज कनेक्शन कट करुन दाखवाच जनतेतून काय प्रतिक्रिया उमटतील ते तुम्हाला कळेलच”, असं राजू शेट्टी म्हणाले.

“लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिला आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.