अक्षय कुमारचा नाशिक पोलिसांना मदतीचा हात, 500 अत्याधुनिक घड्याळांचे वाटप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी (Akshay Kumar Help Nashik police) आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

अक्षय कुमारचा नाशिक पोलिसांना मदतीचा हात, 500 अत्याधुनिक घड्याळांचे वाटप
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 12:07 PM

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी (Akshay Kumar Help Nashik police) आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत पोलीस 24 तास कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत अभिनेता अक्षय कुमारने नाशिक पोलिसांना 500 अत्याधुनिक हातातली घड्याळं दिली आहेत. हे घड्याळ पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे (Akshay Kumar Help Nashik police).

अभिनेता अक्षय कुमार याच्यासह दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडूनही नाशिक पोलिसांना 2 हजार 700 घड्याळांचं वाटप करण्यात आलं आहे. हे घड्याळ दररोज शरीराचा रक्त दाब, तापमान, किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबत सविस्तर माहिती देते.

विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरले? त्यांनी कामं केलीत का? याचंही मोजमाप करण्यास मदत मिळेल. गोकी या कंपनीच हे घड्याळ तयार केलं आहे. हे घड्याळ आता पोलीस आयुक्तालयातील 225 अधिकारी आणि 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या घड्याळांचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अक्षय कुमार आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स यांचे आभार मानले आहेत.

राज्यातील 1140 पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज एका दिवसात तब्बल 73 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1140 वर पोहोचली आहे. यात 120 अधिकारी आणि 1020 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 90 अधिकारी आणि 788 पोलीस कर्मचारी अशा एकूण 878 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर 22 अधिकारी आणि 152 पोलीस कर्मचारी असे एकूण 174 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

तब्बल 22 तास घराची दारं बंद, कोरोनाला उंबरठा ओलांडू न देणारं बीडमधील आदर्श गाव

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.