Raigad video : पॅरासेलिंगवेळी 2 मैत्रिणींसोबत भयावह प्रकार, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला

Raigad video : पॅरासेलिंगवेळी 2 मैत्रिणींसोबत भयावह प्रकार, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 4:00 PM

रायगड : रायगडच्या अलिबागमधून एक काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय. पॅरासेलिंग करताना किती  धोका आहे. हे या व्हिडिओमधून कळून येते. समुद्राच्या मध्यभागी एक असा प्रकार घडला आहे, ते पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. विकेंडला सर्वजण काही ना काही भन्नाट करण्याचा प्लॅन करतात, मात्र योग्य काळजी न घेतल्यास हे किती महागात पडू शकते, कधी कधी जीवावर बेतू शकते ते या व्हिडिओने दाखवून दिलं आहे.

दोन महिला समुद्राच्या मध्यभागी कोसळल्या

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडला. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघी तब्बल 100 मीटर उंचीवरुन समुद्राच्या मध्यभागी पडल्या. यावेळी त्याच बोटीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सुदैवानं दोन्ही महिलांनी लाईफ जॅकेट्स घातले होते, त्यामुळे बोट दोघींपर्यंत पोहचेपर्यंत लाटांवर तरंगत राहिल्य आणि बचावल्या. अलिबागच्या वर्सोली बीचवर पॅरासेलिंगवेळी 27 नोव्हेंबरला हा प्रकार घडला.

पॅरासेलिंग करताना योग्य काळजी घ्या

पॅरासेलिंग करताना योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते. पॅरासेलिंग करताना बोटीला बांधलेल्या दोर मजबूत आहे की नाही यांची आधी तपासणी करून घ्या, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ जॅकेट घालायला कधीही विसरू नका. या दोन महिलांनी लाईफ जॅकेट घातलेले नसते तर कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. अशावेळी अनेकजण घाबरून जातात त्यामुळेही अनेक दुर्घटना घडतात.  त्यामुळे सर्वात आधी सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्या.

इतर महत्वाच्या बातम्या

TATA Safari चं डार्क एडिशन लाँच होणार, जाणून घ्या नवीन व्हेरिएंटमध्ये काय असेल खास?

Stubborn Zodiac | नाद करा पण या 3 राशींचा कुठं!, एखादी गोष्ट करणार म्हणजे करणारच

अवकाळीच्या नुकसान खुणा : उरला-सुरलां कांदाही पाण्यात भिजला अन् दरात मार खाल्ला, 1 रुपयामध्ये 1 किलो कांदा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.