अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी

आयकर विभागानं महाराष्ट्रात एक ऑपरेशन राबवलंय ज्याची सुरुवात 23-9-2021 रोजी झाली होती. ह्या ऑपरेशन मध्ये एक सिंडीकेट उघड झालं असून त्यात काही बिजनसमन, दलाल तसच लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत यातली माहिती हाती लागत गेलीय. जवळपास 25 निवासस्थानं, 15 कार्यालयांची झडती घेण्यात आलीय.

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 11:55 PM

मुंबईः अजित पवार आणि त्यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागानं छापे टाकल्यानं राज्यभरात हा विषय चर्चेत राहिलाय. या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघालेय. त्याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाला या कारवाईसंदर्भात स्पष्टीकरणं द्यावे लागले आहे. आयकर विभागानं दिलेल्या स्पष्टीकरणात महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच कारवाईत अनेक संशयास्पद बाबी आढळल्याचंही नमूद केलंय.

व्यवहार करताना कोडनेमचा वापर

आयकर विभागानं महाराष्ट्रात एक ऑपरेशन राबवलंय ज्याची सुरुवात 23-9-2021 रोजी झाली होती. ह्या ऑपरेशन मध्ये एक सिंडीकेट उघड झालं असून त्यात काही बिजनसमन, दलाल तसच लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत यातली माहिती हाती लागत गेलीय. जवळपास 25 निवासस्थानं, 15 कार्यालयांची झडती घेण्यात आलीय. तर 4 ऑफिसची रेकी करण्यात आली. मुंबईतल्या प्रसिद्ध अशा ओबेरॉय हॉटेलमधल्या दोन सुटसचीही झडती घेण्यात आली. हे दोन्ही सुटस् दलालांनी त्यांच्या क्लायंटसना भेटण्यासाठी कायमस्वरुपी बूक केले होते. ह्या सिंडीकेटमध्ये जे दलाल, बिजनसमन, लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी व्यवहार करताना कोड नेमचा वापर केलेला आहे. यातले काही रेकॉर्ड हे 10 वर्षापूर्वीचे आहेत. हे सर्व व्यवहार हे 1 हजार 50 कोटी रुपयांचे आहेत.

मध्यस्थांनी कधीही उघड होणार नाही अशा संवाद प्रणालीचा वापर

ह्या सर्व व्यवहारात दलालांनी कॉर्पोरेट, उद्योगपतींना एन्ड टू एन्ड सेवा पुरवलीय. त्यात मग जमीन संपादन असो की सरकारी क्लिअरन्स. व्यवहार करण्यासाठी मध्यस्थांनी कधीही उघड होणार नाही अशा संवाद प्रणालीचा वापर केला पण तरीही आयकर विभागाच्या हाती काही महत्वपूर्ण डिजिटल डेटा लागलेला आहे, तो मिळवण्यात यश आलंय. झडतीच्या दरम्यान एका लपण्याच्या जागेचाही शोध लागला आणि तिथूनही काही महत्वपूर्ण पुरावे हाती लागलेत. व्यवहातल्या पैशांच्या ट्रान्सफरसाठी आंगडीयांचाही वापर करण्यात आलाय. अशाच एका शोध मोहिमेत एका आंगडीयाकडून दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आलीय.

प्रत्येक व्यवहार हा 200 कोटी रुपयांचा

एक डॉक्युमेंट असही हाती लागलंय, ज्यात ओव्हरऑल किती कॅश जनरेट करण्यात आली, किती दिली गेली आणि किती वाटायची आहे याची सर्व नोंद त्यात आहे. यातला प्रत्येक व्यवहार हा 200 कोटी रुपयांचा आहे. यातले काही पैशाचे व्यवहार असे आहेत, ज्यात नोकरशहांनी त्यांना हव्या असलेल्या मंत्रालयातल्या विशेष पोस्टिंगसाठी दिलेले आहेत. तर काही कॉन्ट्रॅक्टर्सनी स्वत:च्या कामाची रक्कम मिळावी म्हणून पैसे दिलेले आहेत. मुख्यत: मोठी रक्कम अनेकांना वाटण्यात आलीय, त्यात एका अशाचाही समावेश आहे ज्याची नोंद कोडनेमखाली ठेवण्यात आलीय.

झडतीदरम्यान एका ऑफिसमधून 27 कोटी रुपयांची कॅश डिपॉझिट

ह्या ऑपरेशन दरम्यान एका बिजनेसमन/ दलालानं प्रचंड मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमवल्याचं उघड झालंय. तो शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करायचा आणि मोठे कॉर्पोरेटस तसेच सरकारी संस्थांना विकायचा. ह्या सगळ्या स्किममध्ये वरिष्ठ नोकरशहा, त्यांचे नातेवाईक तसंच प्रतिष्ठीत लोकांनी गुंतवणूक केल्याचं उघड झालंय. झडतीच्यादरम्यान एका ऑफिसमधून 27 कोटी रुपयांच्या कॅश डिपॉजिट तसच 40 कोटी रुपयांच्या कॅश पेमेंटचे पुरावेही मिळालेत तेही तारखेनुसार. एवढच नाही तर 23 कोटी रुपयांच्या अशाही एका व्यवहाराचे पुरावे मिळालेत जे अनेकांना वाटले गेलेत आणि ज्यांच्या नावाआधी कोडनेम टाकलेले आहे. हा जो एक मध्यस्थ किंवा दलाल आहे त्याला अनेक उद्योगपती, इंडस्ट्रियलिस्टनी सरकारी स्किम अंतर्गत जमीन मिळावी म्हणून कॅश पेमेंट केलेलं आहे. टेंडर्स, खनिज खानींच्या कॉन्ट्रॅक्टसाठीही संबंधीत मध्यस्थाला पैसे मिळालेत. एक व्हॉटस अप चॅट असही हाती लागलंय ज्यात 16 कोटी रुपये आणि 12 कोटी रुपयांच्या व्यवहाराची माहिती आहे.

त्यातल्या काहींचा रिअल इस्टेटचा बिजनस

ज्यांची झडती घेतली गेली, त्यातल्या काहींचा रिअल इस्टेटचा बिजनस आहे. त्यांच्याकडून कॅश रिसिप्ट आणि पेमेंटचे पुरावे सापडलेत. मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, आय क्लाऊड, इ मेल्स यावरुन मोठ्या प्रमाणात डिजिटल डाटा जप्त करण्यात आलाय आणि त्याची तपासणी करुन विश्लेषण केलं जातंय. आतापर्यंत जवळपास 4.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त कॅश आणि 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेत. झडती दरम्यान सापडलेले 4 लॉकर्सवर निर्बंध लादण्यात आलेत. तपास प्रगतिपथावर आहे.

संबंधित बातम्या

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.