Ambedkar Jayanti 2023 live : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांनी ढोल ताशांच्या तालावर धरला ताल

| Updated on: Apr 15, 2023 | 8:11 AM

ambedkar jayanti 2023 live updates : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. काल रात्रीपासूनच देशभरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Ambedkar Jayanti 2023 live :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांनी ढोल ताशांच्या तालावर धरला ताल
Dr babasaheb ambedkarImage Credit source: tv9 marathi

मुंबई : भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण देशात जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज सायंकाळी मिरवणुका निघणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2023 08:15 PM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत गुलाबराव पाटलांनी ढोल-ताशांच्या तालावर धरला ताल

    जळगाव :

    जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांसमवेत ढोल ताशांच्या तालावर ताल धरून जल्लोष साजरा केला. दरम्यान याप्रसंगी गुलाबराव पाटलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाळधी गावात गेल्या काही दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण होते मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण पाळधी गावात शांततेचे वातावरण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे

  • 14 Apr 2023 06:58 PM (IST)

    सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांना साहित्य भेट

    आई प्रतिष्ठानतर्फे 135 शालेय विद्यार्थिनींना शैक्षणिक दत्तक घेतले

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कृतिशील अभिवादन

    विडी घरकूल येथील मार्कंडेय हायस्कूलच्या विद्यार्थिनींना साहित्य भेट

    विडी घरकुल येथील विडी कामगारांच्या गरजू मुला-मुलींना मदत

  • 14 Apr 2023 05:50 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना

    ठाणे : जितेंद्र आव्हाड यांची सोशल मिडियाच्या माध्यमातून मानवंदना

    आव्हाड यांच्याकडून समाजमाध्यमांचा अचूक वापर करून संदेश देण्याचा प्रयत्न

    कमी शब्दात बाबासाहेबांचा जन्म, शिक्षण, फुले-शाहू-आंबेडकर यांच्यातील परस्पर संबंध यांची ओळख करून दिली

    शाहू महाराजांनी काढलेले गौरवोद्गार, महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मानवंदना आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव..यांचा समावेश

    इंस्टाग्रामच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केली आहे

  • 14 Apr 2023 03:46 PM (IST)

    ठाणे : बार्टी प्रकरणी १६१ लोकांना फेलोशिप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

    २०० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहे

    लाखो भाविक बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी

  • 14 Apr 2023 02:44 PM (IST)

    जामनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    मिरवणुकीत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

    मिरवणुकीत भीमसैनिकांसोबत लेझीमच्या तालावर गिरीश महाजनांनी धरला ठेका

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली

    या मिरवणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला

  • 14 Apr 2023 01:58 PM (IST)

    आंबेडकर जयंती निमित्त वांद्रे-वरळी सी-लिंकवर तीन दिवस विद्यूत रोषणाई; मुख्यमंत्र्यांचे आदेश

    भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वरात्री दादर येथील चैत्यभूमीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं

    आगामी 3 दिवस रात्री वांद्रे-वरळी सी लिंक वरील विद्युत रोषणाई सुरू ठेवण्याचे निर्देश एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

  • 14 Apr 2023 12:36 PM (IST)

    राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

    दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

    यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि महाराष्ट्र सदनातील अधिकारी उपस्थिती होते.

  • 14 Apr 2023 12:11 PM (IST)

    जळगावच्या जामनेर शहरात आंबेडकर यांची जयंती उत्साहात सुरू

    गिरीश महाजन यांनी घेतला लेझीमच्या तालावर ठेका

    राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

    लेझीम पथक ढोल ताशाचा गजर सुरू, गिरीश महाजन यांनी घेतला लेझीम पथकात सहभाग

    बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, मिरवणुकीतील रथाचे गिरीश महाजन बनले सारथी

  • 14 Apr 2023 12:06 PM (IST)

    बाबासाहेबांच्या विचारांवर चालल्यास देश सर्वशक्तीमान होईल : देवेंद्र फडणवीस

    इंदू मिल स्मारकाचं काम युद्धपातलीवर सुरू

    दर 15 दिवसांनी स्मारकाच्या कामाचा अहवाल मागवला

    पुढील वर्षभरात स्मारक पूर्ण होणार

    चैत्यभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा आंबेडकरी जनतेशी संवाद

  • 14 Apr 2023 11:37 AM (IST)

    पुण्यात दलित युवकांना पेट्रोल डिझेल टँकरचे वाटप

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त दलित युवकांना टँकरचे होत आहे वाटप

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार वाटप

    22 डिझेल, पेट्रोल टँकरचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार वाटप

  • 14 Apr 2023 11:19 AM (IST)

    पुण्यात दलित युवकांना पेट्रोल डिझेल टँकरचे वाटप

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त दलित युवकांना टँकरचे होत आहे वाटप

  • 14 Apr 2023 11:04 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर

    शिंदे-फडणवीस यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

    इंदू मिल स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

    संविधान पथाचा शिलान्यास करणार

  • 14 Apr 2023 10:25 AM (IST)

    आश्रमाचे रूप कधी पालटणार?

    चाळीसगावातील दीनबंधू आश्रम मोजत आहे शेवटच्या घटका

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आश्रमाचे रूप कधी पालटणार?

    याच आश्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झाले होते उपचार.

  • 14 Apr 2023 09:59 AM (IST)

    पुण्यात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भव्य देखावा

    विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती

    पुण्यात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त भव्य देखावा

    पुण्यातील दांडेकर पुलावर उभारण्यात आली गौतम बुद्धाची तब्बल 45 फूट उंचीची मूर्ती

  • 14 Apr 2023 09:31 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी

    छत्रपती संभाजी नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी

    भडकल गेट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात गर्दी

    शहरातील आंबेडकर प्रेमी नागरिकांची मोठी गर्दी

  • 14 Apr 2023 08:33 AM (IST)

    आंबेडकर जयंतीसाठी छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    शहरात असणार तब्बल 1540 पोलिसांचा बंदोबस्त

    3 डीसीपी 4 एसीपी 27 पोलीस निरीक्षक, 87 पीएसआय तर दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

    प्रत्येक मिरवणुकीला एक पोलीस असणार सोबत

    रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूक काढण्यासाठी असणार परवानगी

    क्रांती चौकात येणार सर्वाधिक मिरवणुकी

  • 14 Apr 2023 08:32 AM (IST)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षीच मोठ्या हर्ष उल्हासात साजरी केली जाते

    त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने गेल्या चार दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे

    रात्री 12 वाजता बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात फटाक्याची मोठी आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला सुरुवात केली

    हातामध्ये निळे झेंडे घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला

  • 14 Apr 2023 08:29 AM (IST)

    सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन

    स्पर्शरंग कला परिवाराच्या सदस्यांनी एक सेमी आकाराच्या 10 हजार 132 फोटोपासून बाबासाहेबांची प्रतिमा साकारलीय

    8 बाय 8 फूटाचे पोट्रेट साकारण्यासाठी तब्बल 5 तास लागले आहेत

    स्पर्शरंग परिवार दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवते

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही प्रतिमा साकारण्यात आलीय

  • 14 Apr 2023 08:23 AM (IST)

    महाराष्ट्रासह देशभरात आंबेडकर जयंती जल्लोषात, चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर भीमसागर लोटला

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

    राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं

    चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला

Published On - Apr 14,2023 8:20 AM

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.