आतली बातमी, अकोल्यातील हॉटेलमध्ये दीड तास खलबतं, अमित शाह यांचे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना महत्त्वाचे आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील महत्त्वाच्या शहरांना भेट देवून तिथल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. नुकतीच अमित शाह यांची अकोल्यात एक बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे.

आतली बातमी, अकोल्यातील हॉटेलमध्ये दीड तास खलबतं, अमित शाह यांचे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना महत्त्वाचे आदेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 4:02 PM

गजानन उमाटे, Tv9 प्रतिनिधी, अकोला | 5 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याची चर्चा आहे. अमित शाह आज महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन त्या-त्या भागातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाचे निर्देश देत आहेत. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात अशीच एक बैठक पार पडली आहे. अकोल्यातील जलसा हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली आहे. या बैठकीतली आतली बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. या बैठकीत जवळपास दीड तास लोकसभेची निवडणूक, मतदारसंघ आणि उमेदवार यांच्याबाबत खलबतं पार पडली. त्यानंतर अमित शाह यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. विशेष म्हणजे या बैठकीत कार्यकर्ते देखील होते. या कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होता.

अमित शाह यांनी काय-काय सूचना दिल्या?

  • लोकसभा निवडणुकीत प्रत्येक बूथ मजबूत राहील याकडे लक्ष द्या.
  • महायुतीच्या उमेदवारांसाठीही काम करा.
  • भाजपचा उमेदवार आहे, असं मानून काम करा.
  • मोदी सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवा.

बैठकीत आणखी काय-काय घडलं?

या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत अमित शाह यांच्याकडून बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिंद, अमरावती आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विदर्भातील सर्व लोकसभेच्या जागा आपण जिंकू असा निर्धार करण्यात आला, अशी माहिती या बैठकीत उपस्थित भाजप नेत्याने दिली. “ज्या कारणास्तव आपण मागे पडलो ती कारणं शोधून ती कारणं दूर करुन आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं हे समीकरण बैठकीत मांडण्यात आलं. सहाही लोकसभेत भाजप किंवा मित्र पक्षांचे जे उमेदवार लढतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के प्रतिसाद देऊन निवडून आणण्याचं सांगण्यात आलं”, अशी देखील माहिती एका भाजप नेत्याने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.

Non Stop LIVE Update
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार
“देवाभाऊ, जॅकेट भाऊ अन् दाढी भाऊ”, ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचा पलटवार.
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् रासपच्या उमेदवाराकडून आत्महत्येचा प्रयत्न.
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?
तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही पण आता..,पवारांची राजकारणातून निवृत्ती?.
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक
माझ्या विरोधात षडयंत्र अन्..., अजित दादांच्या उमेदवार सरोज अहिरे भावूक.
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले...
'उठाव केला तेव्हा शंभूराज दोन पाऊलं माझ्या पुढं..', शिंदे म्हणाले....
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
धनुष्यबाण अन् शिवसेना कोणाची? सभेतून शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर.
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'
पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण, 'लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा...'.
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'
'लाडक्या बहिणीं'साठी तुमचा हा भाऊ 10 वेळा जेलमध्ये जायला तयार पण...'.
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.