‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
"कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात 'डॉक्टर हेच देव' ठरत असताना त्यांच्या मानधनात सरकारने कपात करणं, हे कोणत्याही दृष्टीने न पटणारं आहे", असं अमित ठाकरे ठाकरे पत्रात म्हणाले आहेत (Amit Thackeray letter to CM Uddhav Thackeray).
मुंबई : कोरोनाविरोधाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी (Amit Thackeray letter to CM Uddhav Thackeray) यांच्या पगारात कपात केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “कोरोनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात ‘डॉक्टर हेच देव’ ठरत असताना त्यांच्या मानधनात सरकारने कपात करणं, हे कोणत्याही दृष्टीने न पटणारं आहे”, असं अमित ठाकरे ठाकरे पत्रात म्हणाले आहेत (Amit Thackeray letter to CM Uddhav Thackeray).
“महाराष्ट्र सरकारच्या 20 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन 55 हजार ते 60 हजार रुपये इतकं आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना ‘सेवार्थ प्रणाली’ अंतर्गत मिळणारे मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार रुपये इतकं मानधन मिळते. मात्र, नव्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांचे मानधन ‘कंत्राटी सेवा’ अंतर्गत निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात 20 हजार रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. या तरुण डॉक्टरांच्या मानधनातील कपात अन्यायकारक आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.
“वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली आहे. त्यांचं 35 हजार रुपये इतकं मानधन आहे. मात्र, शासनाच्या नव्या आदेशानुसार त्यांना फक्त 25 हजार रुपये वेतन मिळत आहे”, असं अमित ठाकरे म्हणाले. “डॉक्टरांच्या पगारात किंचितही कपात होणार नाही याची काळजी राज्य सरकारने घ्यावी”, असंही अमित ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.
“वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका यांना त्यांचे पूर्वीचेच वेतन देण्याबाबत आपण त्वरित योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कोरोनाविरोधात लढणारे डॉक्टर्स आणि नर्सेस हे योद्धे आहेत या आपल्या विधनाला कोणताही अर्थ उरणार नाही”, असं अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
कोरोना महासाथीत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या आरोग्य सेवकांच्याच मानधनात कपात होणं योग्य नाही. ह्या अग्रणी योद्ध्यांना त्यांच्या परिश्रमाचं किंबहुना योगदानाचं यथायोग्य मोल देणं, हेच खरं प्रोत्साहन. सरकारने ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं; मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांची मागणी. pic.twitter.com/ERTCnjHYEi
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 19, 2020
संबंधित बातम्या :
Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरु, काय बंद?
Lockdown 4.0 Guidelines | राज्य सरकारच्या नियमावलीत लग्न आणि अंतिम संस्काराबाबत कोणत्या अटी?