VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका

शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे. आयुष्यभर त्यांनी आग लावायचे काम केले.

VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका
पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 1:20 PM

नागपूर: शरद पवार (sharad pawar) साहेब हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे लाग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे. आयुष्यभर त्यांनी आग लावायचे काम केले. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे, अशी जहरी टीका रयत क्रांती सेनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली होती. खोत यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक पलटवार केला आहे. आमदारकी जात असल्याने सदाभाऊंची अवस्था पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. त्यामुळेच ते शरद पवारांवर टीका करत आहेत. पवार साहेबांनी काय केलं. यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे आधी शोधणं महत्त्वाचं आहे, असा हल्लाबोल अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केला आहे.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर अमोल मिटकरी यांनीही खोत यांना जशास तसे उत्तर दिलं आहे. सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे. काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

सदाभाऊंनी पाप केलंय

राज्यातील सर्व ऐतिहासिक पुतळ्याचं उद्घाटनं पवार साहेबांनी केलं. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करून सदाभाऊ यांनी पाप केलंय. हे तीन पक्षाचं सरकार आहे. भाजप एका पक्षाचं सरकार असतानाही कुजबूज होत होती. आता तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात काही निधी कमी मिळाला असेल म्हणून त्यांनी बोलून दाखवलं. एखाद्याच्या बोलण्याने महाविकास आघाडीत गोंधळ आहे असं होत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपला लायकी दाखवायचीय

ईडी पक्षप्रमुखांच्या घरांपर्यंत गेलीय. त्यामुळे ते भाजपसोबत जाणार नाहीत. आम्हाला भाजपची लायकी दाखवायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.

टायगर अभी जिंदा है

अनिल देशमुख बाहेर येतील. आम्ही ते पुन्हा गृहमंत्री होतील. दिलीप वळसे पाटील पण सीनिअर आहेत. राज्य उत्पादन शुल्क त्यांच्याकडे आहे. टायगर अभि जिंदा है! आजचा काटोलचा दौरा आधीच ठरलेला आहे. पक्षाचं काम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचे कायम केले, त्यांचे आडनाव आगलावे करा; सदाभाऊंची सडकून टीका

VIDEO: Nanarमध्ये रिफायनरी होणार नाही, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

“एखादी सावळी अभिनेत्री सांगा, जी सुपरस्टार असेल”; बॉलिवूडमधील वर्णभेदावर नवाजुद्दीनने साधला निशाणा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.