अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, आज शहरात शांतता आहे. हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 12:39 PM

मुंबई – त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद  उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती.  जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आज परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दंगलीमधील नुकसानाचा आढावा 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गेले दोन दिवस त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये तणावरपूर्ण वातावर होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने, जिल्हा प्रशासनाकडून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवू, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही  गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीमध्ये ज्याही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानाचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अमरावतीमध्ये तीन दिवसांसाठी संचारबंदी 

अमरावतीमध्ये गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. आज परिस्थिती निवळली आहे. मात्र तरी देखील पुढील तीन दिवस अमरावतीमध्ये संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय  प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काही अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.