अमरावती, गडचिरोली आणि मेळघाटात पावसाचा हाहा:कार…! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर वाहून गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचे मृत्यदेह सापडले!

दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय विविध गावातील 43 घरांपैकी निबोली गावामध्ये 12 नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्यात. त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे.

अमरावती, गडचिरोली आणि मेळघाटात पावसाचा हाहा:कार...! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर वाहून गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचे मृत्यदेह सापडले!
पाऊसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 11:10 AM

मुंबई : राज्यात जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. सर्वदूर पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी गेले तर काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून पुरामध्ये अनेकजण वाहून गेल्याच्या घटना देखील उघडकीस आल्यात. अमरावती (Amravati) जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस धामणगाव रेल्वे तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यातील बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, गोकुळसरा, दिघी महले या गावाबाहेर असलेल्या पुलावरून पाणी असल्याने या 4 गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण (Control) ठेवून आहेत.

अमरावती जिल्हात शेतात वीज पडून एकाचा मृत्यू

दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय विविध गावातील 43 घरांपैकी निबोली गावामध्ये 12 नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्यात. त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे. अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस झाला असून मेळघाटातील सिपणा नदीला महापूर आलायं. दिया गावातील सिपणा नदीत 35 वर्षीय युवक वाहून गेल्याची देखील माहिती मिळते आहे. मेळघाटातही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोलीमध्ये सहा प्रवासी पुराच्या पाण्यात वाहून गेले

गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील पेरमिली पुरात वाहून गेलेल्या सहा प्रवाश्यांपैकी तीन प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्यावर मुसळधार पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी होते. पाण्याचा अंदाज चालकाला न समजल्यामुळे ट्रक पाण्यात वाहून गेला होता. सध्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाचा फटका भामरागडच्या पाच तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे.

हे सुद्धा वाचा

भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलापल्ली-भामरागड महामार्ग तीन दिवसापासून बंद असून भामरागड तालुक्यातील जवऴपास 50 गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयाशी तुटलेला आहे. पावसाळ्याच्या ऐनवेळी कंञाटदार रस्त्याचे काम सुरु करुन भामरागड महामार्गावर खोदकाम केल्याने वाहतुक ठप्प झाली व प्रशासनही भामरागड तालुकाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भामरागड तालुक्यातील वासियांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.