आईच्या मृतदेहावर छातीला बिलगलेली 9 महिन्यांची पोर, पायाला काच रुतून जखमी, अमरावतीतील अंगावर काटा आणणारा प्रसंग

त्या बाईला सकाळपासून मला एवढंच सांगावं वाटते की अग वेडे एकदा आपण आई झाल्यावर आपल्याला अश्याप्रकारे मरायचा अधिकार नसतो गं बाई, बायांनो त्रास सहन होत नाही मान्य, घरी वाद होतात मान्य, पण टोकाचा निर्णय नका घेऊ गं, अशी आर्त विनवणी सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे तळेगावकर यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत केली आहे.

आईच्या मृतदेहावर छातीला बिलगलेली 9 महिन्यांची पोर, पायाला काच रुतून जखमी, अमरावतीतील अंगावर काटा आणणारा प्रसंग
बाळाची काळजी घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी फेसबुकवर आपला अनुभव मांडला
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 3:35 PM

अमरावती : लेकुरवाळ्या बाळाला पोरकं करुन माऊलीने आत्महत्या केली. हृदयाला चटका लावणारी ही घटना अमरावतीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे मृत महिलेच्या छातीला बिलगून 9-10 महिन्यांची मुलगी जिवाच्या आकांताने रडत होती. सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे तळेगावकर यांनी डोळ्याने टिपलेली दृश्यं सांगत अंगावर काटा आणणारा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काय आहे गुंजन गोळेंची फेसबुक पोस्ट

मरण फार स्वस्त झालंय हो

आज सकाळी 8.30 च्या दरम्यान PSI चव्हान सर गाडगेनगर पोलिस स्टेशनमधून फोन आला. आपण गुंजनताई बोलताय का? PKV कॉलेज वेलकम पॉइंटला एका बेवारस बाईचं प्रेत सापडलं आहे, येऊ शकता का तुम्ही? दहा मिनिटांमध्ये पोहोचते म्हणून मी त्या दिशेने निघाले.

अमरावतीमध्ये बेवारस मृतदेह सापडले की पोलिस मला कॉल करतात आणि आम्ही अंतिम विधी करतो. तसाच हा पण फोन असेल असे मला वाटले. पण घटनास्थळी पोहोचताच माझे हात पाय आज पहिल्यांदा ढिले पडले. कारणही तसेच होते.

साधारण 30/32 वर्षांची बाई समोर मृत होती आणि तिच्या छातीला बिलगून अंदाजे 9/10 महिन्यांची मुलगी जिवाच्या आकांताने रडत होती. हाता पायाला काच रुतल्याने जखमा होऊन बाळ प्रचंड अस्वस्थ झाले होते. उजव्या पायाचे फिमर बोन फ्रॅक्चर होऊन पाय प्रचंड सुजला होता. अंगावर पांघरुण काहीही नसल्याने रात्रभर त्या जंगली भागात कडाक्याच्या थंडीत मेलेल्या आईला उठवण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारं बाळ राहून राहून दचकत होतं आणि गर्दी बघून परत रडत होतं. मी त्याला जवळ घेतले, ते दुधपितं बाळ होतं. मेलेल्या आईचे स्तन ड्रेसबाहेर काढून ते रात्री प्यायलं होतं, असं प्रत्यक्ष क्षणी बघितल्यावर आम्ही अंदाज काढला होता.

बाळाला कुशीत घेतलं आणि तिथेच खाली बसून शेकडोंच्या गर्दीत त्याच्या तोंडात पटकन स्तन देऊन दूध पाजू लागले आणि डोळ्यातील पाणी लपवू लागले. माझ्या कुशीत येऊन त्याला नेमकं काय वाटलं, हे माहित नाही त्यानंतर तब्बल पाच तास ते माझ्या कुशीतून बाजूला व्हायलाही तयार नव्हते. त्याला भाऊ ऋषीकेश देशमुखच्या मदतीने परिजात हॉस्पिटलमध्ये नेले. तपासणी करुन जखमांना मलम लावून परत पोलिस स्टेशनला नेले. तेवढ्यात तिथे त्याच महिलेचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा पण सापडला. पुढील प्रोसेस म्हणून डॉ. दिलीप काळे सरांचे मार्गदर्शन घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डबले सरांना कॉल केला, केअर सेंटरमध्ये नेले, आंघोळ घातली, जेवू घातले, परत साडेचार वाजता लेडी कॉन्स्टेबलला घेऊन बाळाला इर्विंनला नेले. डॉक्टरांना विनंती करून x-ray केला. कॉन्स्टेबल ताईने बाळाला प्लॅस्टर लावून परत बाळ केअर सेंटरला नेले. रात्री आठ वाजता PI चोरमोले साहेबांना भेटून पुढील चौकशी आणि काही महत्त्वाचे बोलणे केले. पत्रकारांच्या फोनला प्रतिसाद दिला.

हे सर्व करत अस्ताना कितीतरी वेळा बाळाला माझे दूध पाजले, तेव्हा वारंवार एकच विचार येत होता की त्या बाईला नेमकं काय एवढं दुःख होतं की दुधपित्या लेकराचा विचार येऊ नये? मोठ्या मुलाच्या चौकशीवरुन तिच्या घरचा पत्ता पोलिसांना सापडला, नातेवाईक थोड्या वेळात पोहोचतीलही, पण घरातून नवऱ्याशी वाद होऊन चक्क बुटीबोरी एरियातून लेकरांना घेऊन निघालेली ती बाई अमरावतीला येऊन मरण पावली आणि लेकरांनाच असे पोरकं करून गेली??

त्या बाईला सकाळपासून मला एवढंच सांगावं वाटते की अग वेडे एकदा आपण आई झाल्यावर आपल्याला अश्याप्रकारे मरायचा अधिकार नसतो गं बाई (बायांनो त्रास सहन होत नाही मान्य, घरी वाद होतात मान्य, पण टोकाचा निर्णय नका घेऊ गं. फार वेदनादाई असते हे आपल्या लेकरांसाठी. कुठल्याही स्त्रीला काहीही प्रॉब्लेम असू द्या एक मोठी बहीण म्हणून मला हक्काने कॉल करा मला. मी आहे तुमच्या सोबतीला, नसेल त्रास सहन होत, नाही रहायचं कुठे तर हक्काने या माझ्याकडे, तुम्हाला सुरक्षित ठेवण्याची, तुम्हाला रोजगार देऊन सक्षम करण्याची पूर्ण जबाबदारी माझी गं बायांनो, पण असा पळवाट नका काढू गं, आत्महत्या हा पर्याय नसतो ग)

इतर बातम्या :

घटस्फोटासाठी बायकोकडून एक कोटींची मागणी, व्हिडीओ शूट करत तरुणाची नदीत आत्महत्या

लिफ्ट देण्याचा बहाणा, निर्जनस्थळी नेत महिलांची लूट, पुण्यातील भामटा अखेर जेरबंद

मृतदेह नेणारी गाडी ट्रकवर आदळली, भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.