नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले…अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका

नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नॉटी, नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले...अमृता फडणवीसांची 100 मार्कांची प्रश्नपत्रिका
अमृता फडणवीसांची पुन्हा जळजळीत टीका
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 3:28 PM

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. कधी त्या ट्विटरवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल करतात, तर कधी दुसऱ्या कुठल्या नेत्यांवर. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) महिला नेत्या आणि अमृता फडणवीसांचे ट्विटरवॉर अनेकदा पाहायला मिळाले आहेत. आणि आता अमृता फडणवीसांनी पुन्हा एक जळजळीत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात त्यांनी कुणाचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांचं ट्विट पाहिल्यावर त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे सहज दिसून येत आहे.

अमृता फडणवीसांची प्रश्नपत्रिका

थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे. त्यात पुढे…Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले …..या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? अशी जळजळीत टीका करण्यात आली आहे. त्याच ट्विटमध्ये पुढे…रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! म्हणत,_____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है औरसुनने में आया है _____नामर्द है ! असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे, त्यामुळे त्यांना आता महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे.

अमृता फडणवीसांचे ट्विट काय?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नॉटी हा शब्द खूप गाजत आहे, त्यातच संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हजेरीवरून विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नामर्द असतील अशी घणाघाती टीका केली होती. त्याला अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही नेहीमीच भाजपवर टीका करण्यात आघाडीवर असतात. दोन दिवसांपूर्वीच नवाब मलिकांनी किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल असल्याची टीका केली होती, त्यांना बिगडे नवाब म्हणत अमृता फडणवीसांनी निशाणा साधला आहे. तर मोदींबाबतच्या वक्तव्याच्या वादानंतर नाना पटोले भाजपच्या टार्गेटवर आहेत, काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंवरही निशाणा साधला होता. त्यांनी आता पुन्हा आक्रमक ट्विट करत नाना पटोलेंना टार्गेट केलं आहे.

VIDEO: खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती: संजय राऊत

तर सोमय्यांनी वायनरी ताब्यात घेऊन चालवावी, सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे, शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?: राऊत

संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.