लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार; देशमुखांकडून सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचे आदेश
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. (anil deshmukh order to probe celebrities tweet)
नागपूर: पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे. (anil deshmukh order to probe celebrities tweet)
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
सायना नेहवाल, अक्षयचे ट्विट सारखे कसे?
यावेळी सावंत यांनी देशमुख यांना बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचं ट्विट दाखवलं. दोघांचे ट्विट शब्द न् शब्द सारखे आहे. दोघेही एकाच वेळी सेम ट्विट का करतील? सुनील शेट्टीने तर हितेश जैन नावाच्या व्यक्तीला ट्विटमध्ये टॅग केलं आहे. हा हितेश जैन भाजपचा कार्यकर्ता असून यावरून केवळ भाजपच्या दबावाखालीच हे ट्विट करण्यात आल्याचं स्पष्ट होतं, असं सावंत यांनी सांगितलं. आपल्या सेलिब्रिटीजवर कुणाचा दबाव आहे का? कोणत्या प्रकारचा दबाव आहे? याचीही चौकशी झाली पाहिजे, असं सावंत म्हणाले. पूर्वी अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर दबाव होता. आता सरकारचा दबाव आला का? असा सवालही त्यांनी केला.
दबावाखाली ट्विट्स केले का?
सावंत यांनी मांडलेले मुद्दे गंभीर असल्याने अनिल देशमुख यांनी त्याची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सेलिब्रिटीजनी कुणाच्या दबावाखाली ट्विट केलं होतं का? एकाचवेळी ट्विट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आळा होता का? याची चौकशी होणार आहे. सर्वांच्या ट्विट्समधील साधर्म्यामुळे ही चौकशी होणार असून राज्याच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत ही करण्याचे आदेश दिल्याचं देशमुख म्हणाले. (anil deshmukh order to probe celebrities tweet)
Demanded investigation of BJP connection into the tweets of celebrities & security to be provided to our national heroes if needed & find out whether these celebrities were arm-twisted by BJP. @AnilDeshmukhNCP Ji ordered investigation by Intelligebce unit. https://t.co/KkMfFqzLcc
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 8, 2021
संबंधित बातम्या:
“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन
विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार का?
सेलिब्रिटींना मेंदू नाही काय; संजय राऊत संतापले
(anil deshmukh order to probe celebrities tweet)