‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली (Anil Parab slams BJP).

'आत्मनिर्भर'च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल : अनिल परब
Follow us
| Updated on: Jul 05, 2020 | 3:23 PM

मुंबई :आत्मनिर्भरच्या नावाखाली भाजपवाले कोकणवासियांची दिशाभूल करत आहेत (Anil Parab slams BJP). कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. मात्र, भाजप नेत्यांकडून नागरिकांना खोटी माहिती दिली गेली”, अशी टीका रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी केली (Anil Parab slams BJP).

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (5 जुलै) झूम अ‍ॅपद्वारे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचली नाही, अशी खोटी माहिती भाजपकडून दिली जात आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यासाठी 116 कोटी रुपयांची मदत दिली आहे. यापैकी 54 कोटींचे वाटप झाले तर 62 कोटींचे वाटप सुरु आहे. अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनादेखील मिळाली आहे”, असं अनिल परब म्हणाले.

हेही वाचा : रामनाथ कोविंद यांच्या भेटीला पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती भवनात अर्धा तास चर्चा

“निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं”, असंदेखील अनिल परब म्हणाले.

“स्वतः मुख्यमंत्री कोकणच्या दौऱ्यावर आले. कोकणवासियांना नुकसान भरपाईसाठी भरभरुन मदत दिली गेली. यावर कोणीही बोलत नाही. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना निधीबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची चाचणी प्रयोगशाळा सुरु केली. त्यावरही कोणी बोलत नाही”, असा घणाघात अनिल परब यांनी केला.

हेही वाचा : खाकी वर्दीतील वऱ्हाडी, कन्यादानाला पोलीस अधीक्षक, बीडमध्ये एचआयव्हीबाधितांचा विवाह सोहळा

“कोकणातील आलेल्या निधीपैकी 46.51 टक्के निधीचे वाटप झाले आहे. कोकणात गुंठेवारी शेती केली जाते. त्यामुळे अनेकांची नावे त्यावर असतात. त्यामुळे मदत देताना अडचणी येतात. मात्र, अशाप्रकारे अडचणी येत असतील तर नुकसान भरपाई देताना हमीपत्र घ्या, अशी मागणी आम्ही केली आहे. ती मान्य झाली आहे. त्यामुळे आता मदत वाटपात काही अडचण येणार नाही”, असंदेखील अनिल परब यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.