ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून नाटक रंगवले…अंजली दमानिया यांचा छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा

Anjali Damania Chhagan Bhujbal: आमदार रुसला आणि त्यांची समजूत काढायची गरज नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे आता कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आहे. हे सगळे एक गेम प्लॅन तर नाही ना?

ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून नाटक रंगवले...अंजली दमानिया यांचा छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा दावा
anjali damania chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 12:30 PM

Anjali Damania Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु त्यांच्या नाराजीची दखल पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये ओबीसी नेता हवा म्हणून, हे सर्व नाटक रंगवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया

अंजली दमानिया यांनी सांगितले की, आमदार रुसला आणि त्यांची समजूत काढायची गरज नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे आता कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आहे. हे सगळे एक गेम प्लॅन तर नाही ना? मी फेब्रुवारी महिन्यातच म्हटले होते की छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहेत. तेव्हा भुजबळ म्हणाले होते, असे काहीच नाही. माझा असा काही विचार नाही. त्यामुळे आता ‘नक्की दाल में कुछ काला है’, असे वाटत आहे.

यामुळे नाटक रंगवले

अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे छान नाटक रंगवले गेले आहे. त्यांना मंत्रीपद द्यायचे आहे. आता भुजबळ म्हणतील, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये जावे, असे दाखवले जाईल. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आपला पक्षात घेतील. सगळे त्यांचे कुठेतरी एक छान रंगवलेला नाटक आहे, असेच मला वाटते.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे गप्प का?

बीडच्या घटनेवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, वाल्मीक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मला काही लोकांकडून आणि काही पत्रकारांकडून काही व्हिडिओज मिळाले. त्यात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यांच्या हातात पिस्तूल होता. पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाही, याबद्दल आपणास आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बीडची एवढी मोठी घटना झाली आणि बीडच्या मंत्र्यांनी त्याच्याबद्दल काही चकार शब्द काढू नये? आज पंकजा मुंडे कुठच्या बाजूने आहेत. त्या वाल्मीक कराड याच्या बाजूने आहेत की त्यांच्याविरुद्ध आहेत हे त्यांनी जाहीर करावे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.