पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड, स्थायी समिती अध्यक्ष ताब्यात!

महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड, स्थायी समिती अध्यक्ष ताब्यात!
पिंपरी चिंचवड महापालिका
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:04 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान ही कारवाई नेमकी कुणावर झाली? या कारवाईत किती रुपये ताब्यात घेतले गेले? याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. स्थायी समितीची बैठक आज असल्यानं महापालिका इमारत परिसरात ठेकेदारांची मोठी गर्दी होती. (Anti-Corruption Bureau raid in Pimpri Chinchwad Municipal Corporation)

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. ही बैठक दुपारी सुरु झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयावर धाड टाकली. एसीबीने अचानकपणे टाकलेल्या या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर एकच खळबळ उडाली. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष आणि एक महिला अधिकारी अचानकपणे स्थायी समिती कार्यालयात दाखल झाले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयाता ताबा या अधिकाऱ्यांनी घेतला.

स्थायी समितीचं कार्यालयही बंद

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीचं कार्यालयही बंद केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवेळी दोन ठेकेदार स्थायी समितीच्या कार्यालयातच अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थायी समितीची बैठक असल्यामुळे महापालिका परिसरात आज मोठी गर्दी होती. या कारवाई दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती रक्कम जप्त केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. तर, नोटांची मोजदाद अजून सुरु असल्याचं कळतंय.

इतर बातम्या :

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत पोलखोल स्पर्धा! विकासकामांवरुन आरोपांच्या फैरी

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!

Anti-Corruption Bureau raid in Pimpri Chinchwad Municipal Corporation

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.