पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी… ती सुद्धा फुकट! कर्मचाऱ्यांचं थेट महासंचालकांना पत्र, ऑडिओ क्लिप व्हायरल
डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.
पुणे : पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत. (Audio clip of Pune Social Welfare Commissioner goes viral)
जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
ऑडिओ क्लिप तुम्हीच ऐका
मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
संपूर्ण ऑडिओ क्लिप
महिला डीसीपी-विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती मला पोलीस कर्मचारी-हो… महिला डीसीपी-कुठे? पोलीस कर्मचारी-ते मॅडम…एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी महिला डीसीपी-बरं..अजून तेवढंच आहे? पोलीस कर्मचारी-अजून एक मटण थाली म्हणून आहे कोल्हापूरची महिला डीसीपी-बरं..जास्त चांगली कुठे आहे? पोलीस कर्मचारी-साजूक तुपातली मॅडम…एसपी बिर्याणीची मॅडम..त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे.. पोलीस कर्मचारी-ऑईली बिलकूल नाही..आणि साजूक तुपातली पण चांगली आहे मॅडम..कलर वगैरे नसतं त्यात..काही नाही महिला डीसीपी-बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे..जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल मॅडमनं सांगितलं म्हणून..मी बोलू पीआयला पोलीस कर्मचारी-नाही मॅडम करतो मी महिला डीसीपी-नाही पण..त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण? पोलीस कर्मचारी-आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो महिला डीसीपी-मग तुम्ही काय करायचे? पोलीस कर्मचारी– आपण कॅशच करायचो मॅडम महिला डीसीपी-पे करून? पोलीस कर्मचारी-हो मॅडम…पे करूनच महिला डीसीपी-तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? पोलीस कर्मचारी-येस मॅडम..मी सांगतो महिला डीसीपी-नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते पोलीस कर्मचारी-नाही मी बोलतो महिला डीसीपी-त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही..
इतर बातम्या :
VIDEO: तिसरी लाट येणार म्हणून घाबरून घरातच बसायचं का?; राज ठाकरेंचा सवाल
Audio clip of Pune Social Welfare Commissioner goes viral