जे मलेशिया, सिंगापुरात ते थेट औरंगाबादला, जळगावला जाणाऱ्या वाहनांसाठी 2 कि.मी. भुयारी मार्ग
जळगावकडे जाणारी वाहने या भुयारी मार्गातून जातील. या भुयाराच्या वरील बाजूने समृद्धी महामार्ग असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील संकल्पित दृश्य कधी एकदा प्रत्यक्षात उतरेल, याची वाट शहरवासीय पहात आहेत.
औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या महामार्गांच्या कामं आता पुन्हा एकदा जोमाने सुरु होत आहेत. शहरातील बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) सावंगी इंटरचेंजच्या कामाला गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद-जळगाव (Aurangabad-Jalgaon) रस्त्यावर सावंगी इंटरचेंज येथे दोन किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे. जळगावकडे जाणारी वाहने या भुयारी मार्गातून जातील. या भुयाराच्या वरील बाजूने समृद्धी महामार्ग असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील संकल्पित दृश्य कधी एकदा प्रत्यक्षात उतरेल, याची वाट शहरवासीय पहात आहेत.
सावंगी इंटरचेंजच्या कामाला गती
औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील सावंगी इंटरचेंजच्या कामाने आता वेग घेतला आहे. औरंगाबादहून फुलंब्री, सिल्लोड व जळगावला जाणे-येणे करणाऱ्या वाहनांसाठी इंटरचेंजवर दोन किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जात आहे. भुयारी मार्गावरून समृद्धीचा उड्डाणपूल असेल, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बी.पी. साळुंके यांनी दिली.
हिवाळ्यात आणखी जोमात कामे
औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी 112 किमी असेल. नागपूर शिर्डी हा मार्ग नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत खुला करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. मात्र सततच्या पावसामुळे कामात अडतळे येत होते. आता हिवाळा सुरु झाल्याने उड्डाणपूल, भुयारी मार्गांच्या जोड रस्त्यांची खोळंबलेली कामे जोमाने सुरु होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात पाच ठिकाणी इंटरचेंज
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून ये-जा करता यावी, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी इंटरचेंज असतील. औरंगाबादमधील नागरिकांना सावंगी किंवा माळीवाडा येथील इंटरचेंजचा वापर करावा लागेल. महामार्गाच्या दोन्ही बाजूने आठ फूट उंचीची काँक्रीटची भिंत व त्यावर तीन फूट उंचीचे तारेचे कुंपण असल्याने इंटरचेंजशिवाय इतर ठिकाणाहून महामार्गावर कोणालाही प्रवेश करता येणार नाही. तसेच शहरातील सिडको, हडको, गारखेडा, चिकलठाणा, मुकुंदवाडी या भागातील नागरिकांना मुंबई किंवा नागपूर येथे जायचे असल्यास सावंगी इंटरचेंज जवळचा पडणार आहे.
इतर बातम्या-
सोलापूर-नगर-नाशिक-सुरत ग्रीनफिल्ड हायवे होणार, 50 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याची गडकरींची घोषणा