औरंगाबादेत 70 टक्के एसटी कर्मचारी कर्जबाजारी, वेतनास विलंब होत असल्याने आर्थिक ताण

औरंगाबाद: मागील 24 तासात दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या (ST Driver Suicide) केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पगार वेळेवर न मिळाल्याने बीड आगारातील बस चालकाने गळफास घेतला तर पुंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाचे (State Transport) आर्थिक व्यवस्थापन कोलमडून पडले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाला उशीर होत […]

औरंगाबादेत 70 टक्के एसटी कर्मचारी कर्जबाजारी, वेतनास विलंब होत असल्याने आर्थिक ताण
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:11 PM

औरंगाबाद: मागील 24 तासात दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या (ST Driver Suicide) केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पगार वेळेवर न मिळाल्याने बीड आगारातील बस चालकाने गळफास घेतला तर पुंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रादुर्भावात एसटी महामंडळाचे (State Transport) आर्थिक व्यवस्थापन कोलमडून पडले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनाला उशीर होत आहे. याचाच परिणाम एसटी कर्मचाऱ्यांच्या जीवनावर होत आहे.  शेकडो किलोमीटरचे अंतर कापून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना इप्सित स्थळी सुरक्षित पोहोचवणाऱ्या एसटी चालक व कर्मचाऱ्यांवर असा आर्थिक ताण असणे घातकारी ठरू शकते.

महाराष्ट्रात आतापर्यंत 25 कर्मचाऱ्यांनी जीवन संपवले

कोरोना काळानंतर वेतन थकल्यामुळे एसटी महामंडळाचे असंख्य कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. यातील बहुतांश कर्मचारी कर्जबाजारी आहेत. कोरोना प्रादुर्भावात आतापर्यंत 25 कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.

24 तासात 2 आत्महत्या

पगार वेळेवर न झाल्याने बीड आगारातील चिंताग्रस्त बस चालकाने 11 ऑक्टोबर रोजी घरात गळफास घेत आत्महत्या केली. महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होत असतो, परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने येथील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी राज्य परिवहन महामंडळाने रखडलेले वेतन जारी केल्याची घोषणा केली. त्यापूर्वीच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे, पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 12 ऑक्टोबरला ही घटना घडली.

औरंगाबादेत 70 टक्के कर्मचारी कर्जबाजारी

राज्यात एसटी महामंडळाचे 97 हजार कर्मचारी आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचे 81 हजार कर्मचारी सभासद आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार, या बँकेतर्फे एक हजार 612 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास एक हजार 820 कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतले आहे. ही आकडेवारी जवळपास 70 टक्क्यांच्या घरात जाते. अशीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. बँकेतर्फे तातडीचे कर्ज म्हणून 1.45 लाख रुपयांपासून तीन लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ज्या कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळात दहा वर्षांवर सेवा झाली, त्या कर्मचाऱ्यांना नऊ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

राज्यात किती एसटी कर्मचारी आहेत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण 34,000 चालक, 31,000 वाहक आणि 32,000 इतर असे एकूण जवळपास 97000 एसटीचे कर्मचारी आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.