Aurangabad: मालमत्ता सर्वेक्षणासाठी ड्रोन आणि सॅटॅलाइटद्वारे शहराचा मॅप तयार, प्रत्यक्ष माहितीशी पडताळणी करणार!

शहरात पहिल्यांदाच असे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ह्या सर्वेक्षणाद्वारे शहराच्या प्रत्येक मालमत्तेचा रेकॉर्ड औरंगाबाद महानगरपालिकाकडे डिजिटल माध्यमात उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक मालमत्तेला एक युनिक जीआयएस आय डी दिला जाणार आहे.

Aurangabad: मालमत्ता सर्वेक्षणासाठी ड्रोन आणि सॅटॅलाइटद्वारे शहराचा मॅप तयार, प्रत्यक्ष माहितीशी पडताळणी करणार!
स्मार्ट सिटीतर्फे शहराचा सविस्तर डिजिटल नकाशा तयार
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 3:56 PM

औरंगाबाद: औरंगाबाद स्मार्ट सिटी (Smart City Aurangabad) व औरंगाबाद महानगरपालिका तर्फे पूर्ण शहरात जीआयएस मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येत आहे. या अनुषंगाने आता स्मार्ट सिटी कडे ड्रोन व सॅटलाईट चित्राद्वारे पूर्ण शहराचा विस्तृत मॅप तयार झाला आहे. आता प्रत्यक्ष घरोघरी होणाऱ्या मालमत्ता सर्वेक्षणाद्वारे या ड्रोनद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक व औरंगाबाद स्मार्ट सिटीचे आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी पूर्ण शहराचे मालमत्ता सर्वेक्षण जीआयएस व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे.

प्रत्येक मालमत्तेला युनिक जीआयएस आयडी

शहरात पहिल्यांदाच असे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ह्या सर्वेक्षणाद्वारे शहराच्या प्रत्येक मालमत्तेचा रेकॉर्ड औरंगाबाद महानगरपालिकाकडे डिजिटल माध्यमात उपलब्ध होणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक मालमत्तेला एक युनिक जीआयएस आय डी दिला जाणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त माहितीनुसार प्रशासनाला पूर्ण शहराचे विकास करण्यासाठी विशेष मदत होईल आणि नागरिकांना मालमत्तेवर मालकी हक्काची खात्री मिळेल.

ड्रोनद्वारे शहराचा विस्तृत मॅप तयार

ह्या प्रकल्पंतर्गत औरंगाबाद स्मार्ट सिटी ने गेल्या काही महिन्यात शहराचे विस्तृत रूपाने ड्रोन सर्वे करण्यात आला. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादकडून पूर्ण शहराचे सॅटेलाईट चित्र मागवण्यात आले होते. ह्या चित्रांच्या माध्यमातून आणि जीपीएस व विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शहराचा बहुस्तरीय नकाशा तयार केला आहे. या मॅप वरून प्रशासनाला वेगवेगळे निकष लावून पूर्ण शहराच्या प्रत्येक मालमत्तेविषयी माहिती प्राप्त करता येते. औरंगाबाद स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता अली म्हणाले, सध्या सुरू असलेले घरोघरी मालमत्ता सर्वेक्षणद्वारे मिळालेली माहिती आणि मॅपद्वारे मिळालेली माहिती या दोन्ही मनपा प्रशनसनाला पूरवल्या जातील. दरम्यान स्मार्ट सिटी व मनपाद्वारे नागरिकांना आवाहन केले गेले आहे की, त्यांनी घरी येऊन मालमत्ता सर्वेक्षण करणारे कर्मचाऱ्यांचे आपल्या मालमत्तेशी निगडीत कागदपत्रे व माहिती देऊन सहकार्य करावे.

इतर बातम्या-

Hingoli Crime : हिंगोलीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, नवऱ्यानेच घडवून आणला बायकोवर बलात्कार

45 Years Of Khoon Pasina : मांडीवर वाघ अन् मनात आठवणींचा खजिना, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 45 वर्ष जुना फोटो

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.