Aurangabad: हॉस्पिटलच्या एका बेडचा कचरा काढण्यासाठी 5 ऐवजी लावले 100 रुपये, नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला मनपाची नोटीस

औरंगाबाद: शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांमधील बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचा (Biomedical waste in hospitals) ठेका महापालिकेने नाशिकच्या वॉटरग्रेस (Watergrace company Nashik) कंपनीला दिला होता. मात्र कोरोना काळात कंपनीने शासकीय-खासगी डॉक्टरांकडून अनेक पटींनी वसुली केल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीने एका बेडमागे पाच रुपये घेण्याऐवजी 100 रुपये वसूल केल्याचे दिसून आले आहे. कंपनीने कोणत्या आधारावर एवढी मोठी रक्कम वसूल […]

Aurangabad: हॉस्पिटलच्या एका बेडचा कचरा काढण्यासाठी 5 ऐवजी लावले 100 रुपये, नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला मनपाची नोटीस
बायोवेस्टसाठी दामदुप्पट लावल्याबद्दल औरंगाबाद मनपाची वॉटरग्रेस कंपनीला नोटीस
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 12:22 PM

औरंगाबाद: शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांमधील बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचा (Biomedical waste in hospitals) ठेका महापालिकेने नाशिकच्या वॉटरग्रेस (Watergrace company Nashik) कंपनीला दिला होता. मात्र कोरोना काळात कंपनीने शासकीय-खासगी डॉक्टरांकडून अनेक पटींनी वसुली केल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीने एका बेडमागे पाच रुपये घेण्याऐवजी 100 रुपये वसूल केल्याचे दिसून आले आहे. कंपनीने कोणत्या आधारावर एवढी मोठी रक्कम वसूल केली, याबाबतचा खुलासा औरंगाबाद महानगर पालिकेने (Aurangabad Municipal corporation) मागवला आहे.

राजेश टोपेंच्या दौऱ्यात समोर आले प्रकरण

दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे औरंगाबाद दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी शहरातील रुग्णालयांचा आढावा घेतला. या बैठकांमद्ये वॉटग्रेस कंपनीच्या लुटीचा विषय समोर आला. शहरातील रुग्णालयांमध्ये जेवढे बेड आहेत, त्यानुसार ही खासगी कंपनी दर आकारत असते. माहापलिकेने सुमारे दहा वर्षांपासून हे काम वॉटरग्रेस कंपनीकडेच दिलेले आहे. पूर्वी एका बेडसाठी कंपनी 5 रुपये आकारत होती. मात्र कोरोनाकाळात कंपनीने चक्क 100 रुपये एका बेडमागे वसूल केल्याचे उघडकीस आले आहे.

मनपाने वाढीव दरांना मंजुरी दिलेली नाही

वॉटरग्रेस कंपनीने अव्वाच्या सव्वा बिल लावलेले असले तरीही महानागरपालिकेने वाढीव दरांना अद्याप मंजूरी दिलेली नाही. तसेच कंपनीने कोणत्या आधारावर ही वसुली केली, याबाबतची नोटीस कंपनीला बजावली आहे. ही माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन टँकचा मार्ग मोकळा

दरम्यान, कोव्हिडच्या पहिल्या लाटेत जिल्हा सामान्य रुग्णालयास ऑक्सिजन टँक मंजूर झाला होता. मात्र प्रत्यक्षात टँकचे काम सुरु होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला. कारण हा लिक्विड ऑक्जिन टँक वापरण्यासाठी लागणारे ‘पेसो’ प्रमाणपत्र प्राप्त झालेले नव्हते. आता हे प्रमाणपत्र नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे ऑक्सिजन टँक आता कधीही रुग्णसेवेत वापरता येऊ शकतो, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरांबीकर यांनी दिली.

नादुरुस्त सिटी स्कॅनचा निधीही लवकरच मिळणार

तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नादुरुस्त सिटी स्कॅनचे मशीन दुरुस्त करण्यासाठीचा निधीही लवकरात लवकर मिळाला पाहिजे, अशा सूचना दिल्या. त्यामुळे हा निधी मिळताच सिटी स्कॅनचे मशीनदेखील दुरुस्त करून घेण्यात येईल, अशी माहितीही डॉ. प्रदीप मुरांबीकर यांनी दिली. (A lot of bills were raised by the Nashik based company to pick up BioWaste notice given by Aurangabad Municipal Corporation)

इतर बातम्या- 

मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती, रागाच्या भरात तरुणी गेली तलावावर, दामिनी पथकाच्या समुपदेशनानंतर घरी परतली

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.