हाय काय अन् नाय काय… बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटील हिचा डान्स शो; फेटे उडवले, शिट्ट्यांचा पाऊस

बीड येथील एका व्यक्तीने आपल्या बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला होता. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा उपस्थित होते.

हाय काय अन् नाय काय... बायकोच्या वाढदिवसासाठी चक्क गौतमी पाटील हिचा डान्स शो; फेटे उडवले, शिट्ट्यांचा पाऊस
gautami patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 11:28 AM

बीड : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नृत्याची क्रेझ आता एक दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर ही क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळेच गौतमीचे महाराष्ट्रभर कार्यक्रम होताना दिसत आहे. केवळ कार्यक्रम होत नाहीत. तर तुफान गर्दीत कार्यक्रम होत आहेत. लोकांना उभं राहायला जागा राहत नाही, एवढी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमाला होते. कधीकधी तर गौतमीच्या कार्यक्रमात हाणामाऱ्याही होताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. गौतमीच्या डान्सची क्रेझ इतकी की आता कोणत्याही निमित्ताने तिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला जात आहे. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. गौतमीच्या हाताने त्याने केकही कापला. त्यामुळे गावात चर्चा नाय नसती झाली तर नवलचं.

वाढदिवस साजरा करण्याचा सध्या अनोखा ट्रेंड सुरू झालाय. आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या महिलेच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा शो हा राज्यातला पहिलाच प्रयोग ठरला आहे. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी तरुणाईंनी देखील मोठी गर्दी केली होती. सध्या हा वाढदिवस जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

हे सुद्धा वाचा

केक भरवला

या वाढदिवसाला गौतमी पाटील मराठमोळ्या पद्धतीने वेश परिधान करून आली होती. तर वाढदिवसासाठी मोठा केक आणण्यात आला होता. प्रगती यांनी केक कापल्यानंतर हा केक गौतमीला भरवला. त्यानंतर गौतमीनेही प्रगती यांना केक भरवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गौतमी पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आल्यानंतर गौतमी पाटील यांचा स्टेज शो झाला. यावेळी गौतमी पाटील यांच्या अदाकारी पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. गौतमीच्या प्रत्येक गाण्यावर आणि तिच्या अदाकारीवर गावकरी फेटे उडवत होते. स्टेजच्या चोहोबाजूला लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्यांची आतषबाजी सुरू होती. गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी इतर गावातूनही लोक आले होते.

नाही तर लोक म्हणतील…

गौतमी पाटील यांना बघायला लोक आले आहेत. त्यामुळे मी जास्त भाषण करणार नाही. तुम्हीही कार्यक्रम लवकर आवरा. नाही तर लोक आपल्यालाच आवरा म्हणेल, असं सांगतानाच गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे कार्यक्रम असेच वाढत राहो. त्यांची प्रगती होवो हीच शुभेच्छा देतो, असं सुरेश धस म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....