Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार

औरंगाबादः सिटी ऑफ गेट्स (City Of Gates) नावाने प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादमधील ऐतिहासिक (Aurangabad gates) दरवाज्यांच्या संवर्धनाचे काम स्मार्ट सिटीच्या (Smart city) माध्यमातून सुरु आहे. या प्रकल्पात शहरातील अनेक दरवाज्यांचे संवर्धन होत आहे. मात्र ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात सततच्या पावसामुळे या दरवाज्याचा बराचसा भाग कोसळला. त्यामुळे स्मार्ट सिटीने आता या […]

Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार
ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याची डागडुजी लवकरच होणार
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 4:03 PM

औरंगाबादः सिटी ऑफ गेट्स (City Of Gates) नावाने प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादमधील ऐतिहासिक (Aurangabad gates) दरवाज्यांच्या संवर्धनाचे काम स्मार्ट सिटीच्या (Smart city) माध्यमातून सुरु आहे. या प्रकल्पात शहरातील अनेक दरवाज्यांचे संवर्धन होत आहे. मात्र ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात सततच्या पावसामुळे या दरवाज्याचा बराचसा भाग कोसळला. त्यामुळे स्मार्ट सिटीने आता या दरवाज्याच्या कामाचे सुधारित अंदाजपत्रक बनवून त्यास मंजुरी घेतली आहे.

निविदा प्रसिद्ध, 38 लाख रुपये खर्च होणार

पाणचक्कीजवळील मोडकळीस आलेल्या मेहमूद दरवाज्याचे संवर्धन आणि डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्टसिटीने सुधारीत निविदा प्रसिद्ध केली आहे. दरवाज्याचा मोडकळीस आलेला भाग उतरवून पुन्हा त्याच पद्धतीने चुना वापरून तो भाग बांधला जाणार आहे. या कामासाठी 38 लाख रुपये खर्च येणार आहे. या कामात कुठेही सिमेंटचा वापर होणार नाही. अगदी जुन्या पद्धतीने म्हणजे चुना वापरून हे बांधकाम करण्यात येणार आहे.

खुलताबादः रस्त्यांसाठी अधिकचा निधी देण्यासाठी साकडे

खुलताबाद शहरातील रस्त्याची बिकट अवस्था झाली असून खराब रस्त्यामुळे शहरवासीयांचे व येणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहे. शहरातील रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा असी मागणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे नगराध्यक्ष अ‍ॅड. एस. एम. कमर यांनी केली आहे. लवकरच निधी देण्याचे आश्वासन मंत्री अब्दुल सत्तार यांनी नगराध्यक्ष कमर यांना दिले आहे. मंत्री सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, बांधकाम सभापती किशोर बलांडे व विविध अधिकारी हे नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी आले होते. नगराध्यक्ष कमर यांनी मंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना विनंती केली की, खुलदाबाद शहरात अनेक पर्यटन स्थळे आहे या शहरात भद्रा मारुती मंदिर आहे, बादशहा औरंगजेबाची कबर, जरजरी जर बक्ष यांची दर्गा असून जग प्रसिद्ध बाग बनिबेगम आहे. या शहरात महाराष्ट्रासह देशभरातून दररोज हजारो पर्यटक व भाविक मोठ्या संख्येने येतात. सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून यामुळे येणाऱ्या पर्यटकांचे शहरवासीयांचे हाल होत आहे. खुलदाबाद नगरपालिकेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्याव्या यासह सुवर्णजयंती आणि राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत खुलदाबाद शहरासाठी नवीन पाणी योजना मंजुरीसाठी प्रस्ताव नगराध्यक्षासह इतर नगरसेवकांनीही मंत्रालयाकडे दाखल केला आहे. पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा असी विनंती नगराध्यक्ष कमर यांनी केली.

इतर बातम्या-

औरंगाबादच्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची बांग्लादेशवर विजयी सलामी, आज दुसरा सामना

Crime: नवजात मुलीला कचऱ्यात फेकले, औरंगाबादच्या किराडपुऱ्यातली घटना, घाटी रुग्णालयात मृत्यू

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.