गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश, वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश, वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 6:11 PM

औरंगाबादः गुंठेवारी भागातील अनियमित मालमत्ता नियमित करण्यासाठीची मोहीम औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal corporation) आणखी वेगवान केली आहे. ही मालमत्ता नियमित करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मात्र अनियमित मालमत्तांवर कारवाईसाठी मनपाचा जेसीबी चालवण्यासाठी बाहेर पडेन, असा इशारा महानगरपालिका प्रशासकांनी दिला होता. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी गुंठेवारीतील अनियमित मालमत्तांवर कारवाई न करण्याचे आदेश औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिले आहेत.

01 नोव्हेंबर रोजी चालणार होते बुलडोझर

शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक (कमर्शिअल) बांधकामे तोडण्याचे महापालिका प्रशासनाने तयारी केली होती. मात्र, दिवाळीचा सण समोर असताना ही कारवाई तूर्त स्थगित करावी, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पालिका प्रशासनाला दिले. दरम्यान, तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

आतापर्यंत 1188 संचिका दाखल

महापालिकेने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केल्यानंतर आतापर्यंत 1188 संचिका दाखल झाल्या. त्यातील 694 जणांनी मनपाकडे 6 कोटी 76 लाख 90 हजार रुपये भरले, अशी माहिती नगररचना विभागाचे प्रभारी उपसंचालक जयंत खरवडकर यांनी दिली. मालमत्ता नियमितीकरणासाठी प्रामुख्याने सातारा-देवळाई, पडेगाव- मिटमिटा, गारखेडा, मुकुंदवाडी, रामनगर, जय भवानी नगर, सिडको-हडको, जाधववाडी, मयूर पार्क, हर्सूल, चिकलठाणा भागातील संचिका दाखल होत आहेत.

इतर बातम्या-

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.