अटकेचा विषय निघताच करुणा मुंडेंना अश्रू अनावर, सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जातोय, औरंगाबादेत टीकास्त्र

पती सत्ताधारी पक्षात असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी ते सगळीकडून प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

अटकेचा विषय निघताच करुणा मुंडेंना अश्रू अनावर, सत्ताधाऱ्यांकडून आवाज दाबला जातोय, औरंगाबादेत टीकास्त्र
औरंगाबादेत करुणा मुंडे यांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:04 AM

औरंगाबादः सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे (Karuna Munde) या काल औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेणार होत्या. मात्र ऐनवेळी पोलिसांनी या बैठकीसाठी परवानगी नाकारली. त्यामुळे लोकशाही प्रधान देशात एका महिलेवर सत्ताधाऱ्यांकडून दडपशाही करून रोखले जात आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा-मुंडे यांनी केला. राजकारणात सक्रीय होण्यासाठी करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना केली आहे.

पक्ष बांधणीसाठी राज्यभर दौरे

करुणा मुंडे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या शिवशक्ती सेना पक्षाच्या बांधणीसाठी मी राज्यभर दौरे सुरु केले आहे. पक्षाच्या माध्यमातून महिला, शेतकरी, ऊसतोड कामगार, एसटी कामगार यांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहे. यासाठी मी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काही हितशत्रू जाणूनबुजून मला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी घराणेशाही संपवली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्यांचा प्रश्न आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडेही सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत. पक्षाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणार असल्याची भूमिका करुणा मुंडे यांनी मांडली.

विषय निघताच अश्रू अनावर

बीड येथे कारमध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी अटक झाल्याचा विषय निघताच करुणा मुंडे यांना अश्रू अनावर झाले. जेलमधील ते दिवस कधीही विसरणार नाही, असी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच कौटुंबिक कलहावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची भेट झाली नाही, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलण्याचेही त्यांनी टाळले.

पती सत्ताधारी, आवाज दाबण्याचे प्रयत्न- करुणा मुंडे

राजकीय दौऱ्याच्या निमित्ताने 25 वर्षानंतर आपण घराबाहेर पडल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. तसेच माझा कुणालाही विरोधा नाही. मात्र पती सत्ताधारी पक्षात असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी ते सगळीकडून प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोरोनाचे सर्व नियम पाळून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.

इतर बातम्या-

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.