औरंगाबाद: घाटीत लवकरच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, सुसज्ज कॅथलॅब, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर

हृदय रुग्णांच्या उपचारासाठी 3 डीएम कार्डिओलॉजिस्ट, सर्जन, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र 20 परिचारिकांचा स्टाफ मिळत नाही. या परिचारिका मिळाल्यातर अवघ्या आठ दिवसात घाटीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची उपचार सुविधा सुरु होऊ शकते.

औरंगाबाद: घाटीत लवकरच अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, सुसज्ज कॅथलॅब, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर
घाटी रुग्णालयातील सुपस्पेशॅलिटी ब्लॉकमधील अत्याधुनिक यंत्रसामग्री
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 6:04 PM

औरंगाबाद: घाटीत (Aurangabad Ghati Hospital) उभ्या राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ब्लॉकच्या इमारतीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठीची कॅथलॅब, सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सज्ज झाले आहेत. घाटीत सुपरस्पेशालिटी (Superspeciality) विभाग सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी कोरोनाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांवर तिथे अद्याप उपचार सुरू झालेले नाहीत. मात्र आता या ठिकाणी हृदयरोग विभाग सुरू होण्याची शक्यता आहे.

20 नर्सिंग स्टाफची गरज

हृदय रुग्णांच्या उपचारासाठी 3 डीएम कार्डिओलॉजिस्ट, सर्जन, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र 20 परिचारिकांचा स्टाफ मिळत नाही. या परिचारिका मिळाल्यातर अवघ्या आठ दिवसात घाटीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची उपचार सुविधा सुरु होऊ शकते. प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी याबाबत सुपरस्पेशालिटी विभाग आणि मेडिसिन विभागाचा आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडेदेखील नर्सेसची मागणी करण्यात आल्याची माहिती डॉ. रोटे यांनी दिली.

हृदय शस्त्रक्रियांसाठी गरजूंना खासगीचीच वाट धरावी लागते

सध्या शहरात हृदय शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयाचेच उंबरठे झिजवावे लागत आहेत. अशा आजारांवरील उपचाराचा खर्चही अनेकांना परवडणारा नसतो. मात्र घाटीत हा विभाग सुरू झाल्यास मराठवाडा, खान्देश व विदर्भातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

… तर दररोज दहा शस्त्रक्रिया

सुपरस्पेशालिटी विभागाचे डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले की ‘आमच्या विभागात सर्व मशिनरी तयार आहेत. नर्स मिळाल्या की लगेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुरू करण्यात येईल. खासगीत अँजिओग्राफीला 15 ते 25 हजार रुपये खर्च येतो, तर अँजिओप्लास्टीसाठी आणखी खर्च येतो. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांत दररोज सरासरी 50 शस्त्रक्रिया होतात. मात्र घाटीत हे युनिट सुरू झाल्यास रोज जवळपास दहा शस्त्रक्रिया होऊ शकतात.’

मार्च 2019 मध्ये कॅथलॅब नादुरूस्त

घाटी रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ठप्प आहे. परिणामी घाटीतून खासगी रुग्णालय गाठण्याची वेळ हृदयविकाराच्या रुग्णांवर ओढवत आहे. घाटी रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागात गेल्या काही वर्षांत उपचाराने शेकडो हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनाद मिळाले. येथील कॅथलॅब मार्च 2019 मध्ये नादुरूस्त झाले. कॅथलॅबचा वापर 10 वर्षांवर झाल्याने ती दुरूस्त होणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. घाटी सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये आता कॅथलॅब प्राप्त झाली आहे. परंतु नर्सिंग स्टाफच्या प्रतीक्षेमुळे अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुरु करण्यास अडचणी येत आहेत.

इतर बातम्या- 

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

डॉ. शिंदे खून: क्लू मिळेना, निकटवर्तीयांवर दाट संशय, पोलिसांनी मांडले ठाण, प्रश्नांच्या फैरी, हत्येसाठीची शस्त्रे कुठे पुरली?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.