मनपा निवडणुकीसाठी एमआयएमच्या मोर्चेबांधणीला वेग, असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

शहरातील निवडणुकीकरिता काय रणनीती आखायची, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पक्ष बांधणीचा आढावा घेतला जाईल.  

मनपा निवडणुकीसाठी एमआयएमच्या मोर्चेबांधणीला वेग, असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर
29-30 ऑक्टोबर रोजी असदुद्दीन ओवैसी औरंगाबाद दोऱ्यावर येणार.
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:38 AM

औरंगाबादः महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात (Aurangabad corporation election) विविध पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. या आखाड्यात एमआयएमनेही वेगाने तयारी सुरु केली आहे. शहरातील निवडणुकीकरिता काय रणनीती आखायची, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. येत्या शुक्रवार आणि शनिवारी औरंगाबाद शहरात ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बांधणीचा आढावा घेतला जाणार आहे.

29-30 ऑक्टोबरला ओवैसींचा औरंगाबाद दौरा

येत्या 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर असतील. दरम्यान, शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी नुकताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होताय यावेळी खासदार इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, राज्य कार्यकारिणी सरचिटणीस मौलाना महेफुज उर रहमान, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रभाकर पारधे, गटनेते नासेर सिद्दिकी, अरुण बोर्डे, जिल्हाध्यक्ष समीर साजेद, शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, डॉ. कुणाल खरात, मुन्शी पटेल आदींची उपस्थिती होती. दीर्घकाळ चाललेल्या या मेळाव्यात पक्षाच्या नेत्यांनी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. तसेच नवीन प्रभाग रचनेबाबत माहिती देऊन प्रचाराची रणनीती कशी आखायची, याबाबतही नेत्यांनी मार्गदर्शन केले.

इम्तियाज जलील यांच्यावर पदाधिकारी नाराज

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार असले तरीही शहरातील अंतर्गत नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या मेळाव्याच्या शेवटच्या सत्रात राज्य कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यात डॉ. गफ्फार कादरी, सरचिटणीस मौलाना महेफुज रहमान यांनी पक्षात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलून दाखवले. या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.

मतभेद मिटवण्याच्या ओवैसींनी दिल्या होत्या सूचना

इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी यांच्यात अनेक वर्षांपासून शीतयुद्ध आहे. खासदार ओवेसींनी त्यांना हे मतभेद दूर करण्याचे आवाहन केले होते. एकमेकांच्या घरी जाऊन जेवण करण्याचा सल्लाही दिला होता. मात्र अजूनही हा वाद शमलेला नाही. आता औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या या नेत्यांमधील वाद मिटवण्याचे आव्हान ओवैसींसमोर असेल.

बॅनर ठरले ताज्या वादाचे कारण

एमआयएमच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बॅनरवरून वाद झाल्याचे कळते. एमआयएमच्या बॅनरवर डॉ. गफ्फार कादरी आणि मौलाना महेफुज रहमान यांचे फोटोच नाहीत, यावरून हे दोन्ही नेते इम्तियाज जलील यांच्यावर नाराज आहेत. याला जलील यांनीही उत्तर दिले. मी लोकसभेला उभा राहिलो तेव्हा काही लोक मला दीड लाखही मते मिळणार नाहीत, असे म्हणत होते. हरलो असतो तर मी सेटिंग केल्याचा आरोप केला असता. पण लोकांच्या आशीर्वादाने मी जिंकलो. आता पोस्टरवरील फोटोबाबत कुणाची नाराजी असेल तर स्वतःच्या पैशांनी शहरभर फोटो लावावेत, असे उत्तर जलील यांनी दिले आहे.

इतर बातम्या-

मनपा निवडणूक: औरंगाबाद शहरातील प्रभागाच्या कच्च्या नकाशांचे काम सुरु, वॉर्डांच्या सीमारेषा नव्याने आखल्या जाणार

‘भावी’ काळात ‘आजी-माजी’ एकत्र? औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत 

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.