तीन लाख घेतले, आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी त्याने इतरांना खोलीबाहेर काढले, औरंगाबादेत भोंदू हकिमाला बेड्या!

तुमच्या घरातून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा येईल, असे भोंदूने सांगितले. 2 ऑगस्ट 2020 रोजी पीडितेने त्याला कस्तुरीसाठी एक लाख रुपये दिले. 15 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी आणखी एक लाख रुपये दिले. तेव्हा त्याने पीडितेला खोलीत नेत आत्मा जाण्यासाठी उपचार करावे लागतील, असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले.

तीन लाख घेतले, आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी त्याने इतरांना खोलीबाहेर काढले, औरंगाबादेत भोंदू हकिमाला बेड्या!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 10:08 AM

औरंगाबादः डॉक्टरांकडे जाऊनही डोकेदुखी न थांबल्याने भोंदू हकिमाकडे गेलेल्या महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची घटना औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. शुद्धीवर आल्यावर सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर या भोंदू हकिम फरार झाला होता. औरंगाबादमधील बेगमपुरा पोलिसांनी (Police) दीड महिना शोध घेऊन 19 जानेवारीला अखेर या हकिमाला अटक केली. या भोंदू हकीमाचे नाव मुश्ताक शेख उमर शेक असून तो मूळचा नाशिक येथील रहिवासी आहे.

काय घडली होती घटना?

शहरातील बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मागील अनेक महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास होता. शहरातील नामवंत डॉक्टरांकडे उपचार घेऊनही तिचा त्रास कमी होत नव्हता. महिलेला नातेवाईकाने मालेगावचा एक हकीम उपचार करत असल्याचे सांगितले. रहेमानिया कॉलनीत दुकान असलेल्या आरोपी मुश्ताककडे पीडिता 27 जुलै रोजी गेली. त्यानंतर हकीम पीडितेच्या घरी गेला. घरावर आत्म्याचा प्रभाव असून तीन कस्तुरी खरेदी करून त्याला घरातून काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा खर्च सांगितला.

भूत उतरवण्यासाठी 3 लाखही घेतले

तुमच्या घरातून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी तीन लाख रुपयांचा येईल, असे भोंदूने सांगितले. 2 ऑगस्ट 2020 रोजी पीडितेने त्याला कस्तुरीसाठी एक लाख रुपये दिले. 15 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी आणखी एक लाख रुपये दिले. तेव्हा त्याने पीडितेला खोलीत नेत आत्मा जाण्यासाठी उपचार करावे लागतील, असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले. पीडितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला. पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर मात्र पीडितेला हा प्रकार समजला.

7 डिसेंबर रोजी तक्रार

सदर महिलेने 7 डिसेंबर 2021 रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच, भोंदू हकीम मुश्ताक फरार झाला होता. अखेर बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, तपास अधिकारी विशाल बोडखे यांनी शोध घेत त्याला अटक केली.

इतर बातम्या-

Tilkut Chauth 2022: तिळकुट चौथला चुकूनही हे काम केल्यास महागात पडणार , जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येची उसळी, तब्बल 7 महिन्यानंतर ओलांडला 3 लाखांचा टप्पा, 491 जणांचा मृत्यू

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.