Aurangabad | ज्ञानवापी मशिदीवरील कारवाईच्या विरोधात औरंगाबादेत आंदोलन, मुस्लिम बांधवांची मागणी काय?
ज्ञानवापी मशीद आणि सुल्तान मशिदीवरून सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून देशातील विविध वादग्रस्त मुद्द्यावर येथे चर्चा होईल.
औरंगाबादः वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरील(Gyanwapi Masjid) कारवाईच्या विरोधात औरंगाबादमधील मुस्लिम भाविकांमध्ये (Muslim Community) प्रतिक्रिया उमटत आहेत. आज शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी निषेध व्यक्त केला. या मशिद परिसरात हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. यासाठी कोर्टाच्या (Varanasi court) आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात येत आहे. मशीद परिसरात शिवलिंग सापडल्याचाही दावा करण्यात येत आहे. मात्र मुस्लीम बांधवांचा या कारवाईला विरोध आहे. आज औरंगाबादमध्येही त्याचे पडसाद उमटले.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
औरंगाबादमधील मुस्लीम बांधवांकडून आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. ज्ञानव्यापी मंशिदीवरील कारवाई तत्काळ थांबवण्याची मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे.
वाराणसी कोर्टात आज काय घडलं?
वाराणसी कोर्टात आज सर्वेक्षणाचा अहवाल दाखल करण्याबाबत सुनावणी झाली. याचिकाकर्ते सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी कथित शिवलिंगाच्या चारही बाजूला बनलेली भिंत हटवण्याची मागणी केली आहे. शिवलिंगाच्या चारही बाजूची भिंत हटवण्यात यावी. कारण शिवलिंगाला सिमेंट आणि दगडांमध्ये गडप केलं, असा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.
मशिदीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात
दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. मुस्लिम पक्षकारांनी मशिदीच्या सर्वेक्षणाला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. तसेच ज्ञानवापी मशीद आणि सुल्तान मशिदीवरून सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली आहे. आज ही बैठक होत असून देशातील विविध वादग्रस्त मुद्द्यावर येथे चर्चा होईल.