Aurangabad Updates: औरंगाबाद खंडपीठात कोरोनाचा कहर, आजपासून ऑनलाइन सुनावणीला प्रारंभ!

औरंगाबाद खंडपीठात प्रकरणांच्या सुनावणीचे कामकाज मंगळवारपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे.

Aurangabad Updates: औरंगाबाद खंडपीठात कोरोनाचा कहर, आजपासून ऑनलाइन सुनावणीला प्रारंभ!
औरंगाबाद खंडपीठ
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 11:18 AM

औरंगाबादः जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपाठात (Aurangabad bench) आजपासून विविध खटल्यांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, यासाठी वकिलांसह काही न्यायमूर्तींनीही आग्रह धरला होता. मात्र खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणी झाली. त्यातील काहीजण बरे होऊन कामावर रुजू झाले असले तरीही पुढील धोका लक्षात घेता आजपासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय झाला आहे.

पुढील दोन आठवडे ऑनलाइन सुनावणी

औरंगाबाद खंडपीठात प्रकरणांच्या सुनावणीचे कामकाज मंगळवारपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन चौधरी आणि सचिव अ‍ॅड. सुहास उरगुंडे यांनी दिली. खंडपीठातील काही न्यायाधीश, वकिलांना कोरोनाची लक्षणे दिसून आली असून न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोर्टात सुरु असलेली इतर कामे, ज्यांना शक्य आहे, त्यांनी घरातूनच करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात नवे 596 कोरोनाबाधित

सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. तरीही मनपा हद्दीतील रुग्णांची संख्या 463 तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 133 एवढी नोंदवली गेली. दरम्यान, 364 जणांना काल सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख पन्नास हजार 362 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.

सद्यस्थितीत 7 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राजनगर, रेल्वेस्टेशन रोड येथील 93 वर्षीय पुरुष, भगतसिंगनगर येथील 78 वर्षीय पुरुष आणि उस्मानपुरा येथील 81 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या-

 Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?

Mumbai Air Quality | मुंबईत दशकातल्या सर्वात धोकादायक हवेची नोंद, कुलाबा, माझगावला सर्वाधिक फटका!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.