औरंगाबादच्या ‘बर्थ डे’ ची सगळीकडे चर्चा, झाडांच्या पहिल्या वाढदिवसाला सेंद्रीय खतांचा यम्मी केक

मियावाकी घनवन पद्धतीने लागवड केलेल्या या झाडांचे यशस्वीरित्या संगोपन झाल्याने एका वर्षात झाडांची उंची २० फुटांपर्यंत पोहोचली असून त्याचे घनदाट जंगलात रुपांतर झाले आहे.

औरंगाबादच्या 'बर्थ डे' ची सगळीकडे चर्चा, झाडांच्या पहिल्या वाढदिवसाला सेंद्रीय खतांचा यम्मी केक
झाडाच्या वाढदिवसानिमित्त केला सेंद्रिय खतांचा केक
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 4:18 PM

औरंगाबाद: शहर आणि परिसरात सध्या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची चर्चा सुरू आहे. हा वाढदिवस एखाद्या राजकीय नेत्याचा किंवा अभिनेत्याचा नव्हे तर चक्क झाडांचा आहे. बुधवारी (25) पैठण (Paithan) तालुक्यातील ब्रह्मगव्हाण शाळेत हा सोहळा पार पडला. जिल्हा परिषद, वन विभाग, इकोसत्व, ग्राइंड मास्टर व कारपे आदी संस्थांच्या माध्यमातून ब्रह्मगव्हाण प्राथमिक शाळा व नदीकाठ वस्तीशाळा अशा दोन्ही ठिकाणी मागील वर्ष प्रत्येकी दोन हजार चौरस फुटात 600 पेक्षा जास्त देशी वनस्पतींची लागवड करण्यात आली होती. मियावाकी घनवन पद्धतीने लागवड केलेल्या या झाडांचे यशस्वीरित्या संगोपन झाल्याने एका वर्षात झाडांची उंची २० फुटांपर्यंत पोहोचली असून त्याचे घनदाट जंगलात रुपांतर झाले आहे. विशेष म्हणजे या वाढदिवसासाठी खास सेंद्रिय खतांचा केकही बनवण्यात आला होता. सहप्रशिक्षक रवी केदारे (Ravi Kedare) यांनी तयार केलेला हा केक सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. (Aurangabad city all Top news update News today in Marathi live Aurangabad crime news and other updates)

तोतया अधिकाऱ्याने मागितली 60 लाखांची खंडणी 

औरंगाबाद: तुम्ही दीड कोटी रुपयांचा आयकर बुडवला आहे, अशी तक्रार आपल्याकडे दाखल झाल्याचा खोटा ड्रामा करत तोतया आयकर अधिकाऱ्याने बांधकाम व्यवसायिकाला धमकावत 60 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना काल घडली. खंडणी मागितल्यानंतर खुद्द बांधकाम व्यवसायिकानेच या सर्व प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन केले आणि त्याचे व्हिडिओ पोलिसांना दिले. बांधकाम व्यावसायिक सुशांत दत्तात्रय गिरी यांना ही खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी जवाहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र जवळगेकर, संजय पारख आणि महेश चौधरी (तिघेही रा. बीड बायपास परिसर) ही गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. यापैकी महेश चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या विकासकामांना आणखी गती मिळणार….

औरंगाबाद: केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत औरंगाबाद शहरात होत असलेल्या विविध विकास कामांना आता आणखी पाठबळ मिळणार आहे. शहरातील स्मार्ट शहरबस, सफारी पार्क, एमएसआय प्रकल्प, जीआयएस मॅपिंग आदी प्रकल्प आणखी जोमाने सुरु होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी प्रकल्प पाच वर्षांकरिता होता. मार्च 2022 त्याची मुदत संपणार असली तरीही ही विकासकामे पुढेही चालूच राहतील. कारण केंद्रीय वित्त आयोगाने 2021-2026 या पाच वर्षांकरिता केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात नवीन शहरांच्या निर्माणासाठी देशातील निवडक आठ शहरांना प्रत्येकी एक हजार कोटी देण्याची शिफारस केली आहे. या शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. शहराने स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत केलेल्या कामांच्या मूल्यांकनानुसार, यात औरंगाबादचा समावेश झाला आहे.

दैनिक लोकमतच्या वृत्तानुसार, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, औरंगाबादला अतिरिक्त एक हजार कोटी रुपये देण्याची बाब स्वागतार्ह आहे. स्मार्ट सिटी योजनेत चांगले काम केल्याचीही पावती आहे. परंतु या संदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अद्याप आलेले नाहीत. केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. यात प्रत्येक शहरासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित होता.

शुक्रवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद: जायकवाडीतून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जायकवाडी पंप हाऊसजवळ मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. या घटनास्थळाच्या बाजूलाच महावितरणचे उपकेंद्र आहे. ही गळती वाढल्यास या उपकेंद्रात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी शुक्रवारी (27) ऑगस्ट रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

ही गळती 1200 मिमी जलवाहिनीला झाली आहे. त्यामुळे केवळ 700 मिमी व्यासाच्या एकाच जलवाहिनीद्वारे शहरात पाणी येईल. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे ढकलल्याची माहिती, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली.

दै. दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून पाणीपुरवठा बंद केला जाईल. जलवाहिनी रिकामी करून, दुरूस्ती केल्यानंतर त्यात पाणी भरण्यासाठी 12 तासांचा कालावधी लागेल. त्यामुळे शहर व सिडको परिसराला शुक्रवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

इतर बातम्या

Special Report | औरंगाबाद जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोका

VIDEO | औरंगाबादच्या उच्चभ्रू वस्तीत 16-17 गाड्यांची तोडफोड, मध्यरात्री हुल्लडबाजांचा धुमाकूळ

(Aurangabad city all Top news update News today in Marathi live Aurangabad crime news and other updates)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.