Aurangabad District cooperative Milk Union: निवडणुकीसाठी 99 पैकी 25 अर्ज बाद, आता लक्ष माघारीकडे

देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यातील बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहे. निवडणुकीसाठी आलेल्या 99 पैकी 25 जणांचे अर्ज बाद झाले आहेत.

Aurangabad District cooperative Milk Union: निवडणुकीसाठी 99 पैकी 25 अर्ज बाद, आता लक्ष माघारीकडे
गायी दुधाच्या दरात पुन्हा तीन रुपयांनी वाढ झालेली आहे.
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:48 AM

देवगिरी महानंद या नावाने मराठवाड्यातील बाजारपेठेत स्थान मिळवलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या (Aurangabad District cooperative Milk Union) निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहे. संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यापैकी 25 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. 11 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहेत. या निवडणुकीत 14 जागांसाठी तब्बल 99 जणांनी अर्ज दाखल केले होते.

जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम असा-

– औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 14 जागांसाठी 24 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. – 27 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार होती. – 11 जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. – 12 जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार – 22 जानेवारी रोजी मतदान होईल – 23 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

यंदा भाजप विरुद्ध काँग्रेसची वर्चस्वाची लढत

सध्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हे संघाचे अध्यक्ष आहेत तर शिवसेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक नंदलाल काळे हे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी यंदा प्रत्येक जागेसाठी उमेदवार उभे केले आहेत.  दूध महासंघासाठी एकूण 350 मतदार मतदान करतील. यापैकी फुलंब्रीत 81 तर औरंगाबाद तालुक्यात 61 मतदार आहेत. या दोन्ही तालुक्यांत आमदार हरिभाऊ बागडे आणि माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी धडपड दिसून येईल.

इतर बातम्या-

Video : 48 कोटींहून जास्त वेळा पाहिला गेलाय ‘हा’ व्हिडिओ, काय आहे खास? तुमचंही डोकं चक्रावून जाईल

IND vs SA : शमी ठरला द. आफ्रिकेचा कर्दनकाळ, या 5 गुणांच्या जोरावर यजमानांचा उडवला धुव्वा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.