‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, व्हेंटिलेटर्सचा दर्जा ठरवून उगाच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका’; कोर्टाने राजकारण्यांना फटकारले
निकृष्ट व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राजकारण्यांना चांगलेच झापले आहे. तुम्ही तज्ज्ञ नाहीत. (aurangabad court slammed politician over useless ventilators issue)
औरंगाबाद: निकृष्ट व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राजकारण्यांना चांगलेच झापले आहे. तुम्ही तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर्सचा दर्जा ठरवून या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. उगाच रुग्णांच्या जीवाशीही खेळू नका, अशा शब्दात औरंगाबाद खंडपीठाने राजकारण्यांना फटकारले आहे. (aurangabad court slammed politician over useless ventilators issue)
औरंगाबाद खंडपीठात कोरोनाप्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने राजकारण्यांना खडेबोल सुनावले. तुम्ही व्हेंटिलेटरमधील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्याचा दर्जा ठरवू नका. व्हेंटिलेटरचा दर्जा तज्ज्ञांना ठरवू द्या. या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. उगाच रुग्णांच्या जीवनाशी खेळू नका, अशी तंबीच कोर्टाने राजकारण्यांना दिली.
पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर्स
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर्स फंडातून 150 व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र, हे व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांनी केला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या व्हेंटिलेटर्सवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. त्याकडे याचिकेद्वारे कोर्टाचं लक्ष वेधण्यात आलं होतं. त्यावर कोर्टाने राजकारण्यांचे कान उपटले आहेत.
काँग्रेसची टीका
काँग्रेसने पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर खराब असल्याचा दावा केला होता. पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर्स तकलादू आहे. त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 17 मेच्या अहवालानं केंद्र सरकार, तसंच गुजरात भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडलाय. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारनं पीएम केअर फंडातून राज्याला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.
‘फडणवीस, पाटलांनी व्हेंटिलेटर चालू करून दाखवावे’
पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर्स पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीसजी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करून दाखवावे असे आमचे आव्हान आहे, असं ट्वीट सावंत यांनी केलं होतं.
..तर व्हेंटिलेटर केंद्राला साभार परत करू: देसाई
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही व्हेंटिलेटरवरून केंद्रावर निशाणा साधला होता. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला व्हेंटिलेटर दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहोत. पण किमान चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर देण्याची गरज आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील बंद पडलेले 185 व्हेंटिलेटर्स पुरवठादाराच्या तंत्रज्ञांना दुरूस्त करता आले नाहीत. त्यामुळे सदोष व्हेंटिलेटर्स बदलून द्यावे. अन्यथा, निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारला साभार परत करावे लागतील, असा इशारा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिला होता. (aurangabad court slammed politician over useless ventilators issue)
Mahafast | दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार लवकरच जीआर काढणारhttps://t.co/SWTWietG92#Mafast | #Corona | #Mahafastnews | #SSC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर फडणवीस, पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसचं आव्हान
खासगी रुग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित करा, पुण्याच्या महापौरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
(aurangabad court slammed politician over useless ventilators issue)