Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

कार सुसाट घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनीही तितकाच वेगवान पाठलाग करत जेरबंद केल्याची घटना औरंगाबादेत नुकतीच घडली. तब्बल 60 किमीच्या या थरारक पाठलागाची चर्चा काल शहरात सुरू होती.

Aurangabad Crime: 60 किमीचा फिल्मी स्टाइल थरार, ट्रायल म्हणून कार पळवणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 9:47 AM

औरंगाबाद: जुनी कार खरेदी-विक्री दालनातील एक कार ट्रायल म्हणून काही चोरट्यांनी पळवली. सोबत आलेल्या दालनातील कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून कार अज्ञात स्थळी नेली आणि दीड लाख दिले तरच कार परत देईन अन्यथा मालकाचा खून करेल, अशी धमकी दिली. त्यापुढेही कार सुसाट घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनीही तितकाच वेगवान पाठलाग करत जेरबंद केल्याची घटना औरंगाबादेत नुकतीच घडली. तब्बल 60 किमीच्या या थरारक पाठलागाची चर्चा काल शहरात सुरू होती. शहरातील गुलाबविश्व हॉलजवळ वैष्णवी मोटर्स(Vaishnavi Motors)  हे जुन्या वाहन खरेदी-विक्रीचे दुकान आहे. तेथे बुधवारी दुपारी 12 वाजता सय्यद अरबाज सय्यद आरेफ (24, रा. रोशन गेट) आणि फैसल रफिक सय्यद (24रा. रहेमानिया कॉलनी) हे दोघे आले. दालनाचे मालक पाटील यांच्याशी चर्चा करून वोक्सवॅगन कंपनीची कार (एमएच 25 डिसी 3488) खरेदी करण्याची तयारी दाखवली. तसेच खरेदी करण्यापूर्वी कारची एका ट्रायल घ्यायची विनंती या दोघांनी केली. त्यामुळे दालनमालकांनी आपला 21 वर्षीय कर्मचारी रोहन संजय इंगळे  (Rohan Sanjay Ingle) याला  सोबत दिले.

ट्रायल सुरु झाली अन् थरारही…

फैसल आणि सय्यद या दोघांनी कारची ट्रायल सुरु केली. ड्रायव्हर अरबाजच्या बाजूला कर्मचारी राहूल तर मागील बाजूस फैसल बसला होता. नारेगावच्या दिशेने गाडी वळताच फैसलने राहुलच्या गळ्याला चाकू लावला. तो प्रचंड घाबरला. अरबाजने गाडी एपीआय कॉर्नरमार्गे जालना रस्त्यावरून थेट बाबा चौकापुढील निर्मनुष्य भागात नेली.

‘दीड लाख दे, नाही तर मालकाला मारून टाकू’

कार निर्मनुष्य रस्त्यावर नेल्यानंतर कर्मचारी रोहनला ‘ दीड लाख दिल्याशिवाय कार मिळणार नाही, तसेच तुझ्या मालकालाही मारून टाकू’ अशी धमकी देत या दोघांनी त्याला उतरवून दिले. रोहन खाली येताच कार सुसाट वेगाने घेऊन हे दोघे निघून गेले. बाबा पेट्रोलपंप परिसरात उतरलेल्या रोहनने ही सर्व माहिती आपल्या मालकाला दिली.

गुन्हे शाखेने सुसाट वेगाने सूत्रे हलवली

अंडरवर्ल्ड डॉनला पकडण्यासाठी ज्या प्रकारे चित्रपटांमध्ये थरारक पाठलाग केलेला दर्शवतात. त्याच पद्धतीनं औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेनं सूत्र हलवली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सीचे वरिष्ठ निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी तत्काळ दालनाकडे धाव घेऊन घटनाक्रम समजून घेतला. त्यानंतर छावणी, महामार्ग पोलिस, वाळूज एमआयडीसी, दौलताबाद, वैजापूर, वाहतूक शाखा अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना अलर्ट करत रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या. आणखी एक पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे लुटारू कोणत्या दिशेने गेले याचा माग घेतला. लुटारुंची दुचाकी दालनासमोर उभी होती. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोलिस पोहोचले. संबंधित लुटारूंची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्याचे लक्षात आले.

65 किमीचा फिल्मी स्टाईल पाठलाग

आरोपींची ओळख पटली असली तरी त्यांचा पाठलाग करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आघाव, केंद्रे यांनी चार पथके चार दिशांना रवाना केली. गाडी नगरच्या दिशेने जात असल्याचे कळाले. त्यानुसार पाठलाग सुरू झाला. पोलिसांच्या गाडीला आरोपींनी दोनचा जोरदार टक्कर दिली. पण टोलनाक्यापासून 13 किमी अंतरावर समोरूव ट्रक आल्याने आरोपींना गाडी रस्त्याच्या खाली उतरवावी लागली, आणि अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात आले. हे दोन्ही आरोपी मोबाइलच्या दुकानात कामाला होते. उधारी फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. (Aurangabad Crime 60 km filmy style thrilling chase, car hijackers caught by police Maharashtra)

इतर बातम्या: 

Aurangabad Crime: लग्नाच्या ६ व्या दिवशीच नववधू पळाली, पावणे दोन लाख रुपये आणि दागिने घेऊन मध्यस्थीही पसार

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.