Aurangabad | धुळे-सोलापूर हायवेचे 24 एप्रिल रोजी लोकार्पण, मंत्री नितीन गडकरी येणार, आणखी कोणत्या कामांना मुहूर्त?

औरंगाबादमधील महत्त्वाचा मार्ग म्हणजे धुळे-सोलापूर हायवे (Dhule Solapur Highway). औरंगाबादमार्गे जाणाऱ्या धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते येत्या 24 एप्रिल रोजी होणार आहे.

Aurangabad |  धुळे-सोलापूर हायवेचे 24 एप्रिल रोजी लोकार्पण, मंत्री नितीन गडकरी येणार, आणखी कोणत्या कामांना मुहूर्त?
औरंगाबदामधील धुळे-सोलापूर महामार्गImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकर्पण येत्या 2 मे रोजी होणार असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं. औरंगाबादमधील समृद्धी महामार्गाची पाहणीदेखील त्यांनी केली. औरंगाबादमधील दुसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे धुळे-सोलापूर हायवे (Dhule Solapur Highway). औरंगाबादमार्गे जाणाऱ्या धुळे-सोलापूर हायवेचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते येत्या 24 एप्रिल रोजी होणार आहे. शहरातील जाबिंदा ल़न्स किंवा एसएफएस मैदानावर हा सोहळा रंगणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. सोलापूर ते औरंगाबादमार्गे धुळे हा एन एच 211 अंतर्गत शहराबाहेरून जाणारा महामार्ग वाहुतकीसाठी खुला झाला असून त्याचा लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. एनएच 211 सह चार पूर्ण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण आणि जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या कामांचे भूमीपूजनदेखील नितीन गडकरी करतील. अनेक दिवसानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी शहरात येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सध्या औरंगाबादेत सुरु आहे.

बीड बायपास वरील ताण कमी

नव्याने तयार झालेल्या धुळे सोलापूर हायवेमुळे शहरातून जाणाऱ्या बीड बायपासवरील जड वाहतूकीचा ताण पूर्णपणे कमी झाला आहे. 21 डिसेंबर रोजी हा महामार्ग पूर्ण झाला. औरंगाबादमधून जाणाऱ्या या महामार्गावरील 30 किमीच्या अंतरात 1 पूल आहे. तर 2 पूल नव्याने बांधले आहेत. 10 ठिकाणी सर्व्हिस रोड आहेत. 8 अंडरपास आहेत. 4 पादचारी मार्ग, जनावरांसाठी 1 मार्ग, 2 जंक्शन्स आहेत. यात कुठेही ओव्हर ब्रिज नाही.

कोणत्या कामांचे भूमीपूजन?

-औरंगाबाद ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामाचे भूमीपूजन होईल. 1670 कोटी रुपयांतून हा प्रकल्प साकारला जाईल. – दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा ते रंगारी देवगावमार्गे शिऊर दुपदरी रस्त्याचे डांबरीकरण, 185 कोटींतून हा प्रकल्प साकारला जाईल. – कसाबखेडा ते देवगाव रंगारी रस्त्याचे दुपदरीकरातून डांबरीकरण, 31 कोटींतून हा रस्ता साकारला जाईल. – चिखली दाभाडीमार्गे तळेगाव ते पाल फाटा दुपदरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, 350 कोटींतून हा प्रकल्प साकारला जाईल.

अखंड उड्डाणपूलाचे काय?

चिकलठाणा ते वाळूज या अखंड उड्डाणपूलाचे काय होते, याकडेही औरंगाबादकरांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र अद्याप या प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला नाही, अशी माहिती डॉ. भागवत कराड यांनी दिली. केंद्रीय नगरविकास खात्याने त्या पुलावरूनच मेट्रो मार्गासाठी तत्त्वतः मान्यता दिली. यासाठी साडेसात कोटींतून संयुक्त डीपीआर होत असून 30 लाख रुपये संस्थेला दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Aurangabad | चिकलठाणा परिसरात कचरा डेपोला आग, कचरा प्रक्रिया केंद्राचे मोठे नुकसान

Sharad Pawar Live : महाराष्ट्रातल्या लोडशेडिंगवर ठाकरे सरकार काय करतंय? पवार म्हणाले पुढच्या 4 दिवसात…

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.