Aurangabad | उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळू लागली, दौलताबाद किल्ल्याभोवतीची आग अखेर शमली

किल्ल्याच्या आत अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने किल्ले परिसरातील पाण्याद्वारेच आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आली. किल्ल्यातील कचेरी बारव आणि सरस्वती बारव खंदकातून मोटर लावून पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 Aurangabad | उष्ण झळांनी मोर, लांडोर, माकडे सैरावैरा पळू लागली, दौलताबाद किल्ल्याभोवतीची आग अखेर शमली
शुक्रवारी दौलताबाद किल्ले परिसरात आगImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 9:47 AM

औरंगाबाद | पर्यटननगरी औरंगाबादचे वैभव (Aurangabad tourism) असलेल्या दौलताबादच्या किल्ल्याला (Daulatabad Fort) शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. मागील वर्षी याच महिन्यात आगीने किल्ल्याला (Fire in Daulatabad) वेढले होते. त्यानंतर पुन्हा यावर्षी तोच प्रकार घडला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरु झालेली ही आग किल्ल्यातील मिनारपर्यंत पोहोचली. अचानक लागलेल्या या आगीमुळे गावातील नागरिकांची पळापळ झाली. किल्ल्याभोवतीची वनसंपदा आणि प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी स्थानिक आणि प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. दुपारी किल्ल्याच्या परिसरात सोसाट्याचा वारा होता, त्यामुळे आगही वेगाने फोफावली. काही वेळातच तिने रौद्ररुप धारण केले होते. किल्ल्याभोवतीचा जवळपास 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणे कठीण होते. अखेर अग्निशमन विभागाच्या शर्थच्या प्रयत्नांनी आग विझवली गेली. शुक्रवारी दुपारी लागलेली ही आग विझवण्याच्या प्रयत्नांना सायंकाळी यश आले.

मोडर, लांडोर, माकडे सैरभैर

दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. मात्र या आगीमुळे येथील पक्षी आणि प्राण्यांच्या जीवावर बेतले. आगीची तीव्रता वाढू लागली तशी येथील पक्षी, मोर, लांडोर, माकडे, सैरभेर झाली. परिसरातील झाचे मात्र आगीत जळून खाक झाली. काही प्राणाही या आगीत भाजले गेले. आगीनंतरचे हे दृश्य अत्यंत भयावह आणि निसर्गाचं विद्रुप स्वरुप दाखवणारं होतं. किल्ले परिसरातील ऐतिहासिक मिनार, शाही हमाम, रशीदबाग, जुन्या संग्रहालयापर्यंत आगीची धग पोहोचली.

किल्ल्यातीलच बारवेच्या पाण्याने विझवली आग

किल्ल्याच्या आत अग्निशमन विभागाचा बंब जात नसल्याने किल्ले परिसरातील पाण्याद्वारेच आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आली. किल्ल्यातील कचेरी बारव आणि सरस्वती बारव खंदकातून मोटर लावून पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान अग्निशमन विभागाने रस्त्याच्या बाजूची आग विझवली. यात किल्ल्याच्या अवतीभोवती असलेली मोठी वनसंपदा जळून खाक झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत आगीचे लोळ दिसत होते.

आगीवर कायस्वरुपी उपाययोजना हवी

दौलताबाद किल्ला परिसरात मागील सहा वर्षांपासून आग लागण्याच्या घटना घडत आहे. किल्ल्याच्या भोवती खासगी जमिनींची संख्याही वाढली आहे. त्यात आसपासचे गावकरी गुरांना चरण्यासाठी तेथे घेऊन येतात. किल्ल्याभोवतीचा जवळपास 350 एकर परिसर असल्याने ही आग लवकर नियंत्रणात आणणे कठीण होते. पण वारंवार होणाऱ्या अशा प्रकारांवर कायम स्वरुपी उपाययोजना केली जावी, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.

इतर बातम्या-

Nagpur Crime | अजनीमध्ये Star कासवांची तस्करी, वन विभागाने तीन आरोपींना केली अटक

कृषिमंत्री दादा भुसेंच्या कामांची ईडी, एसआयटी चौकशी करा; भाजपची व्हिडिओ लावून मागणी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.