शेतकऱ्याच्या हातातली दीड लाखांची बॅग हातोहात पळवली, औरंगाबादच्या गंगापूरात भीतीचे वातावरण

गंगापूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडेही पोलीस सर्रास दुर्लक्ष करत आहेत. येत्या दहा दिवसात तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करून पोलिस प्रमुखांना जाब विचारला जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिला आहे.

शेतकऱ्याच्या हातातली दीड लाखांची बॅग हातोहात पळवली, औरंगाबादच्या गंगापूरात भीतीचे वातावरण
मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 4:36 PM

औरंगाबादः दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी शेतकऱ्याच्या बातातील दीड लाख रुपयांची रक्कम हातोहात पळवल्याची घटना (Bag stolen) गंगापूर तालुक्यात (Aurangabad crime) घडली. विशेष म्हणजे भर दुपारी रस्त्यावर वर्दळ असताना ही घटना घडली. मागील वर्षभरात तालुक्यात गंगापूर, घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी बहुतांश घटनांचा पूर्ण तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. येत्या दहा दिवसात तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करून पोलिस प्रमुखांना जाब विचारला जाईल, असा इशारा मनसेचे (Aurangabad MNS) जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिला आहे.

दुपारी दीड वाजेच्या सुमारास चोरी

29 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी रवींद्र लक्ष्मण म्हस्के हे शहरातील लासूर नाका येथील एका पतसंस्थेत आले होते. या ठिकाणी त्यांनी सोने तारण ठेवून येथून कर्ज घेतले होते. कर्जाची ही दीड लाख रुपयांची रक्कम घेऊन ते पतसंस्थेतून जवळच असलेल्या आयसीआयसीआय बँकेत जमा करण्यासाठी जात होते. रस्ता ओलांडत असतानाच मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील दीड लाख रुपये रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. पलायन केले. त्यानंतर म्हस्के यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून दूरपर्यंत धूम ठोकली. या प्रकरणी म्हस्के यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्ररा दाखल केली आहे.

वर्षभरात अनेक लुटमारीच्या घटना

गंगापूर तालुक्यात मागील वर्षात अनेक लूटमारीच्या घटना घडल्या. यात लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. यातील अधिक प्रकार हे बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे प्रकार आहे. त्यामुळे आता बाहेरगावी जायचं म्हटलं की नागरिकांना भीती वाटत आहे. गंभीर बाब म्हणजे, यातील बहुतांश प्रकरणांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. तालुक्यातील अवैध धंद्यांकडेही पोलीस सर्रास दुर्लक्ष करत आहेत. येत्या दहा दिवसात तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करून पोलिस प्रमुखांना जाब विचारला जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिला आहे.

इतर बातम्या-

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

ड्रायव्हिंगचा ‘हा’ Video पाहून तुम्ही म्हणाल, आपल्यातही हवं असं कौशल्य; सोशल मीडियावर तुफान Viral

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.